lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > चीनला झटका... 200 अमेरिकी कंपन्या भारतात येण्यास इच्छुक

चीनला झटका... 200 अमेरिकी कंपन्या भारतात येण्यास इच्छुक

अमेरिकेच्या जवळपास 200 कंपन्या आपले उत्पादन केंद्र (मॅन्युफॅक्चरिंग सेंटर) लोकसभा निवडणुकीनंतर चीनमधून भारतात आणण्यास इच्छुक आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 04:36 PM2019-04-27T16:36:12+5:302019-04-27T16:38:51+5:30

अमेरिकेच्या जवळपास 200 कंपन्या आपले उत्पादन केंद्र (मॅन्युफॅक्चरिंग सेंटर) लोकसभा निवडणुकीनंतर चीनमधून भारतात आणण्यास इच्छुक आहेत.

about 200 US companies seeking to move manufacturing base from china to india usispf | चीनला झटका... 200 अमेरिकी कंपन्या भारतात येण्यास इच्छुक

चीनला झटका... 200 अमेरिकी कंपन्या भारतात येण्यास इच्छुक

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या जवळपास 200 कंपन्या आपले उत्पादन केंद्र (मॅन्युफॅक्चरिंग सेंटर) लोकसभा निवडणुकीनंतर चीनमधूनभारतात आणण्यास इच्छुक आहेत. अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध मजबूत करण्यास प्रयत्नशील असलेली स्वयंसेवी संस्था यूएस-इंडिया स्ट्रेटजिक अँड पार्टनरशिप फोरमने (USISPF) याबाबतची माहिती दिली आहे. 

चीनच्या ऐवजी इतर पर्याय शोधणाऱ्या कंपन्यांकडे भारतात शानदार संधी उपलब्ध आहे, असे फोरमने म्हटले आहे. ग्रुपचे अध्यक्ष मुकेश अघी यांनी सांगितले की, अनेक कंपन्या चर्चा करत आहेत. भारतात गुंतवणूक करुन कशाप्रकारे चीनला पर्याय उपलब्ध होईल. तसेच, नवीन सरकारला सुधारणा वाढविण्यासाठी आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सूचना ग्रुपकडून देण्यात येणार आहेत.  

ई-कॉमर्स, डेटा यावर सक्तीचा प्रभाव नाही
एका मुलाखतीत सांगितले की, 'मला असे वाटले की हे संवेदनशील आहे. आम्ही प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि 12 ते 18 महिन्यात योग्य सूचना देणार आहेत. आम्ही पाहात आहोत की, ई-कॉमर्स, डेटाचे लोकल स्टोरेज यासारख्या निर्णयाला अमेरिकी कंपन्या स्थानिक फॅक्टर न मानता आंतराष्ट्रीय फॅक्टर मानत आहेत.' 

'नवीन सरकारने सुधारणांना गती द्यावी'
गुंतवणूक वाढवण्यासाठी नवीन सरकारने काय केले पाहिजे असे मुकेश अघी यांना विचारले. यावेळी ते म्हणाले, 'नवीन सरकारने सुधारणांना गती देण्याची गरज आहे. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणली पाहिजे आणि अधिक पक्षांसोबत सल्ला मसलत करणे गरजेचे आहे.'

Web Title: about 200 US companies seeking to move manufacturing base from china to india usispf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.