lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > डॉलर वधारल्याने सोने कडाडले!; दुष्काळातही लग्नसराईमुळे मागणी

डॉलर वधारल्याने सोने कडाडले!; दुष्काळातही लग्नसराईमुळे मागणी

रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर वधारल्याने व आंतरराष्ट्रीय पातळीवर भाव वाढल्याने सोने कडालले आहे. आठवडाभरात सोने ८०० रुपये प्रती तोळ््याने वाढून ३२ हजार ९०० रुपयांवर पोहोचले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 01:34 AM2019-05-16T01:34:45+5:302019-05-16T01:34:52+5:30

रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर वधारल्याने व आंतरराष्ट्रीय पातळीवर भाव वाढल्याने सोने कडालले आहे. आठवडाभरात सोने ८०० रुपये प्रती तोळ््याने वाढून ३२ हजार ९०० रुपयांवर पोहोचले आहे.

Gold futures up; Demand for wedding due to famine | डॉलर वधारल्याने सोने कडाडले!; दुष्काळातही लग्नसराईमुळे मागणी

डॉलर वधारल्याने सोने कडाडले!; दुष्काळातही लग्नसराईमुळे मागणी

जळगाव : रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर वधारल्याने व आंतरराष्ट्रीय पातळीवर भाव वाढल्याने सोने कडालले आहे. आठवडाभरात सोने ८०० रुपये प्रती तोळ््याने वाढून ३२ हजार ९०० रुपयांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे अक्षय तृतीयेनंतर ही भाव वाढ झाली आहे. मार्चनंतर दोन महिन्यांनी सोने पुन्हा एकदा ३३ हजाराच्या उंबरठ्यावर आहे.
एकीकडे दुष्काळ असला तरी लग्न सराईमुळे सोन्याच्या मागणीतही वाढ झाली आहे. चांदी आठवड्यापासून किलोमागे ३९ हजारांवर स्थिर आहे. गेल्या आठवड्यात ६९.६२ रुपये मूल्य असलेले डॉलरचे दर ७०.३५ रुपयांवर पोहचले आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने १०० रुपयांनी कमी होऊन ३२ हजार १०० रुपयांवर आले होते. मात्र त्याच्या दुसऱ्या दिवसापासून दररोज भाववाढ होत आहे.
अडीच महिन्यांत चांदीचे भाव थेट तीन हजार रुपये प्रती किलोने कमी झाले आहेत. चांदी ५ मे रोजी वाढून ३९ हजार रुपये प्रती किलोवर पोहोचली. तेव्हापासूने भाव कायम आहे.

रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर वधारण्यासह आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वाढले. लग्नसराईमुळे मागणी वाढत असल्याने सोन्याचे भाव वाढत आहे.
- अजयकुमार ललवाणी,
अध्यक्ष, जळगाव सराफ असोसिएशन

Web Title: Gold futures up; Demand for wedding due to famine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं