संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 

दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल २०२४च्या सामना संजू सॅमसन ( Sanju Samson) च्या विकेटमुळे गाजला...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 06:07 PM2024-05-09T18:07:50+5:302024-05-09T18:08:09+5:30

whatsapp join usJoin us
A massive controversy erupted over a contentious catch taken by Shai Hope to dismiss Sanju Samson, New Video Shows What Actually Happened | संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 

संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल २०२४च्या सामना संजू सॅमसन ( Sanju Samson) च्या विकेटमुळे गाजला... त्याला वादग्रस्त पद्धतीने बाद दिल्याचा आरोप होत आहे. संजू सॅमसनला बाद करण्यासाठी शे होपने सीमारेषेवर अफलातून झेल घेतला. झेल पूर्ण करताना तो सीमारेषेच्या अगदी जवळ होता. तिसऱ्या पंचाने त्याला आऊट दिले पण सॅमसनने मैदान सोडण्यास नकार दिला आणि तो अम्पायरकडे दाद मागताना दिसला. त्याच्या या वागण्याची बीसीसीआयने दखल घेऊन त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली. त्या वादग्रस्त झेलवरून मोठा वाद सुरू झाला. ८६ धावांवर फलंदाजी करणाऱ्या सॅमसनची विकेट मिळताच दिल्लीने मॅच फिरवली.   


शेप होपचा पाय सीमारेषेवर लागला होता अशी बरीच चर्चा झाली आहे. आता, अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, सॅमसनला बाद दिल्याचा निर्णय योग्य असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. शे होपचा पाय सीमारेषेला लागला नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले आहे.  आयपीएल-विजेते प्रशिक्षक टॉम मूडी यांनी सांगितले की शे होपने झेल घेतल्यावर सीमारेषा अजिबात हलली नाही. 


पण, माजी खेळाडू व समालोचक नवज्योतसिंग सिद्धू यांनी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितले की, होपने सीमा रेषेला स्पर्श केला होता. सामन्याला कलाटणी देणारा निर्णय म्हणजे संजू सॅमसनला बाद करणे. यावर मतभिन्नता असू शकते, परंतु जर तुम्ही साइड-ऑन अँगलमध्ये पाहिले तर होप सीमारेषेला दोनदा स्पर्श करतोय, हे अगदी स्पष्ट होते. एकतर तुम्ही तंत्रज्ञान वापरू नका, किंवा जर तुम्ही ते वापरत असाल आणि तंत्रज्ञान चूक करत असेल, तर असे आहे की दुधात माशी आहे आणि कोणीतरी तुम्हाला ते पिण्यास सांगत आहे.  

Web Title: A massive controversy erupted over a contentious catch taken by Shai Hope to dismiss Sanju Samson, New Video Shows What Actually Happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.