Next

3 महिन्यात पूरग्रस्तांना प्लॉट वाटप करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 15:30 IST2019-09-03T15:28:19+5:302019-09-03T15:30:18+5:30

मुंबई - सांगली-कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. पूरग्रस्तांचे पुनर्वसन जलदगतीने करण्यात येत आहे. तसेच पूरग्रस्तांना देण्यात येणारे ...

मुंबई - सांगली-कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. पूरग्रस्तांचे पुनर्वसन जलदगतीने करण्यात येत आहे. तसेच पूरग्रस्तांना देण्यात येणारे प्लॉट अंतिम झाले आहेत. तर प्लॉटची मोजणी सुद्धा झाली असून पुढील आठवड्यात प्लॉट वाटप करणार असल्याची माहिती गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या राजेंद्र मिरगणे यांनी दिली आहे.