पावसामुळे वाहतूक मंदावली; नाशिक हायवेवरील वाहतूक संथगतीने
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 15:15 IST2019-08-02T15:14:51+5:302019-08-02T15:15:17+5:30
पूर्व दृतगती मार्ग म्हणजे वाहतूक कोंडीचे ठिकाण, असा आता समज नाही तर पक्का विश्वासच झालाय. अनेक ठिकाणी पडलेले खड्डे, ...
पूर्व दृतगती मार्ग म्हणजे वाहतूक कोंडीचे ठिकाण, असा आता समज नाही तर पक्का विश्वासच झालाय. अनेक ठिकाणी पडलेले खड्डे, बेशिस्त अवजड वाहतूक आणि वाहतूक कोंडी नियोजनाचा अभाव यामुळे आता भर दुपारी देखील या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी पहायला मिळते. त्यामुळे काही मिनिटांच्या प्रवासाला किमान एक तास तरी ताटकळत प्रवाशांना रहावं लागतं. ठाणे ते कल्याण पूर्व दृतगती मार्गावर ही अशा प्रकारे वाहतूक कोंडी हल्ली रोजच पहायला मिळते.