एसटीच्या कार्यक्रमात पत्रकार आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 18:39 IST2018-02-15T18:38:52+5:302018-02-15T18:39:36+5:30
मुंबई - अभिनेता अक्षय कुमार यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल एसटी बसस्थानकावर सँनिटरी नँपकीन "च्या स्वयंचलित मशीनचे उद्घाटन करण्यात ...
मुंबई - अभिनेता अक्षय कुमार यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल एसटी बसस्थानकावर सँनिटरी नँपकीन "च्या स्वयंचलित मशीनचे उद्घाटन करण्यात आले. परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. तथापि कार्यक्रम निमुळत्या जागेत असल्यामुळे पत्रकार आणि उपस्थित कार्यकर्ते यांच्यात धक्काबुक्की झाली. यामुळे काही इलेक्ट्रॉनिक माध्यमातील प्रतिनिधींच्या कॅमेरा साहित्याचे देखील नुकसान झाले. (व्हिडिओ - महेश चेमटे)