Next

भाजपाध्यक्ष अमित शाह मुंबईत, शाही स्वागताचा प्रवाशांना फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 23:14 IST2018-04-05T23:13:58+5:302018-04-05T23:14:14+5:30

मुंबई : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीमुळे आजही अनेकांना त्रास सहन करावा लागला. मुंबई विमानतळावर ...

मुंबई : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीमुळे आजही अनेकांना त्रास सहन करावा लागला. मुंबई विमानतळावर शहांचे आगमन झाल्यावर त्यांच्या स्वागतासाठी भाजपाच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्या गर्दीमुळे विमानतळाकडे निघालेल्या अनेक विमान प्रवाशांच्या गाड्या वाहतूक कोंडीत अडकल्या. दरम्यान, भारतीय जनता पार्टीचा उद्या (दि.6) स्थापना दिवस असून, त्यानिमित्त मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स स्थित बीकेसी मैदानावर भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अमित शहा मुंबईत आले आहेत.