Join us  

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतला 'हा' बालकलाकार आहे खूपच प्रसिद्ध, तुम्ही त्याला ओळखले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 6:00 AM

इतक्या लहान वयात त्याने टीव्ही विश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्याच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे. मालिकेत या छोट्याशा चिमुकल्यांना पाहून चाहतेही त्यांच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत.

नुकतीच सुरु झालेली “माझी तुझी रेशीमगाठ” ही मालिका पहिल्या भागापासून रसिकांची पसंती मिळवत आहेत. मालिकेतील कलाकारही रसिकांच्या ओळखीचेच असल्यामुळे आवडत्या कलाकारांना नवीन भूमिकेत पाहणे रसिकांसाठीही उत्सुकता निर्माण करणारेच आहे. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांसारखे लोकप्रिय कलाकारांना मालिकेत पाहणेही रसिकांनाही एक वेगळाच आनंद देणारा आहे. या मालिकेच्या निमित्ताने प्रार्थना बेहरेचेही श्रेयस तळपदेसोबत काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. 

मालिकेची आणखी दुसरी बाजू म्हणजे प्रसिद्ध कलाकारांसोबत दोन बालकरांमुळेही मालिका आणखी रंजक बनली आहे. मायराने तर आधीच सर्वांची पसंती मिळवली होती. मायराने परीची भूमिका साकारली आहे.तर मायरासोबत आणखी एक बालकलाकाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मालिका सुरु होण्याआधीच हिट ठरत होती. मालिकेचे प्रोमो  झळकल्यापासून रसिकही मालिका पाहण्यासाठी उत्सुक होते.

श्रेयस तळपदे यश भूमिकेत झळकत आहे. यशच्या मोठ्या काकूचा मुलगा ‘पिचकू’ ची भूमिका बालकलाकार 'वेद आंब्रे' साकारत आहे. दोन्ही बालकलाकारांच्या अभिनयाने मालिका आणखी उठून दिसत आहे. वेद यापूर्वीही काही मालिकांमध्ये झळकला आहे. त्यामुळे रसिकांसाठी हा बालकलाकार ओळखीचाच आहे.

 

 'आई कुठे काय करते' या मालिकेत ज्युनिअर यशच्या भूमिकेत झळकला होता. या मालिकेव्यतिरिक्त 'गाथा नवनाथांची', 'स्वराज्यजननी जिजामाता', 'सिंधू', 'डॉ बाबासाहेब आंबेडकर', 'विठू माऊली','तू माझा सांगाती', 'लक्ष्मी सदैव मंगलम', 'ग्रहण','खुलता कळी खुलेना', 'लक्ष्य', 'सावधान इंडिया', 'अस्मिता', 'स्पेशल ५', 'आपला माणूस' अशा अनेक गाजलेल्या मालिकेत तो झळकला आहे. 

इतक्या लहान वयात त्याने टीव्ही विश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्याच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे. मालिकेत या छोट्याशा चिमुकल्यांना पाहून चाहतेही त्यांच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. तगडी कलाकारांची फौज,  दमदार अभिनय, हावभाव, संवाद, छायाचित्रण या सगळ्याच बाबतीत मालिका खास ठरत असल्याचे पाहायला मिळतंय. मालिकेची सुरुवात तर दमदार झालीय त्यामुळे आगामी काळात मालिका कितपत रसिकांचे मनोरंजन करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  

टॅग्स :श्रेयस तळपदे