Join us  

'रात्रीस खेळ चाले ३'मध्ये शेवंताच्या भूमिकेत आता दिसणार ही अभिनेत्री, अपूर्वा नेमळेकरने मालिकेतून घेतली एक्झिट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 3:19 PM

‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेत सध्या नवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत.

झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले ३’ (Ratris Khel Chale 3) या मालिकेत सध्या नवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत. या मालिकेतील माई, अण्णा नाईक, शेवंता या प्रमुख पात्रांसह इतर सह पात्रांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. मात्र आता या मालिकेतील लोकप्रिय पात्र शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. 

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या तिसऱ्या पर्वातही शेवंता हे पात्र मुख्य आकर्षण होते. शेवंता या पात्राला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. मात्र, आता अपूर्वा मालिका सोडणार असल्यामुळे प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसला आहे. मात्र, अपूर्वाने ही मालिका का सोडली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिच्या जागी लवकरच अभिनेत्री कृतिका तुळसकर ही भूमिका साकारताना दिसणार आहे.

वच्छीची नव्या लूकमध्ये एन्ट्री

दरम्यान सध्या या मालिकेत आणखी एका आवडत्या पात्राची एन्ट्री झाली आहे. या मालिकेत वच्छी हे पात्र साकारणारी अभिनेत्री संजीवनी पाटील ही सध्या अगदी नव्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे. तिच्या हातात काठी, डोक्यावर पांढरा टिळा आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या दिसत आहेत. तिचे पांढरे झालेले केस, पांढऱ्या रंगाची साडी हा लूक पाहून प्रेक्षकही थक्क झाले आहे. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागातच प्रेक्षकांना वच्छीच्या येण्याने एक रंजक वळण पाहायला मिळणार आहे. तर अपूर्वा ही मालिका सोडणार असल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

टॅग्स :रात्रीस खेळ चाले ३अपूर्वा नेमळेकर