Join us  

तुम्ही फूड ॲडिक्ट आहात का? ही घ्या लिस्ट आणि तपासून पहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 1:55 PM

खूप जास्त खाता किंवा कमी खाता, अमूकच खाता किंवा डाएट करताय याचा या फूड ॲडिक्शनशी संबंध नाही.

अर्चना रायरीकर

तुम्ही खाण्या पाण्याविषयी फूडॲडिक्टेड आहात का? हो म्हणजे गोड पाहिजेच, पाणी पुरी हवीच, चॉकलेट लागतेच, चहा हवाच टाइप्स, साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ, ठराविक ब्रँड्स जसे की बर्गर्स पिझ्झाचे हवेच. बरं मग तुम्ही डाएट वर आहात का? मग दिवसभर मी काय खाऊ हे खाऊ की ते खाऊ असा विचार करत बसता का?या दोन्ही केसेस मध्ये तुम्ही फूडॲडिक्टेडच आहात.म्हणजेच चवीचवीचे असो वा डाएट चे असो तुम्ही सतत सतत मी काय खाऊ असा विचार करत बसता.मग काय होते खरी भूक असो व नसो केवळ विचार धावतात मेंदू कडे, हॉर्मोन्स करतात काम आणि आपली जीभ खवळते आणि आपण काहीही गरज नसताना खात बसतो. जस्ट लाईक दॅट फॉर फन ॲण्ड लक्झरी.

पण हे सतत खात राहणं आपल्याला हेल्दी ठेवते का?

तर नाही उलट त्यामुळे आळस येतो, पोट डब्ब होते, झोप येते आणि मेंदू तर कधी कधी बधिर पण होतो. खरं तर अन्नाशी एक चांगले नाते जमवणे खूप महत्त्वाचे आहे. पण हे नाते जमवताना स्वतःला स्वतःच्या प्रेमात पडणे आधी जमले पाहिजे. पण त्याआधी फूड एडिक्शन किंवा क्रेव्हिंग्ज का होते ते आपण पाहू.

१. चहा कॉफी 

आपल्या शरीरात कॅफेन आणी टेनिन हे काही आपल्या रक्ताचे मूळ घटक नाहीत म्हणूनच ते घेऊन त्यांची सवय आपल्या शरीराला लागते आणि आपण ते घेतले नाही की त्यांचे विड्रॉअल सिमटम्स ये तात आणि डोके दुखायला लागते. क्रेव्हींग असतेच, त्याचं ॲडिक्शन होतं.

२. स्वीट पॉयझन

आपण जितके कार्बोहायड्रेट खातो त्या प्रमाणात शरीरात इन्शुलिन तयार होते. इन्शुलिन भूक वाढवणारे हार्मोन आहेत्यामुळे जितके इन्शुलिन स्त्रवेल त्या प्रमाणात शरीरास जास्त जास्त भूक लागणार म्हणजेच जेवण झाले की गोड खावेसे वाटणे यांचे देखील ॲडिक्शन होतेच

३. पोकळ वासा, शरीरात पोषक मूल्यांचा अभाव 

जितकी पोषण मूल्ये कमी तितक्या पेशी उपाशी. मग खोटी भूक नक्की आणि चुकीचे खाणे पक्के.

४.पाणी कमी पिणे 

बरेचजण पाणी प्यायला आळस करतात पण आपल्या शरीरातील तहान लागण्याची प्रक्रिया नैसर्गिकरित्या शरीर खूप जास्त डी हायड्रेट झाल्याशिवाय होत नाही त्यामुळे प्रत्यक्ष तहान नसली तरी शरीरात पाणी कमी झाले तर खोटी भूक लागू शकते.

 

५. दिल की बाते दिल ही जाने 

यामुळे कॉर्टिसोल नावाचे हॉर्मोन तयार होते त्यामुळे लेप्टीन आणि इन्सुलिन यांच्या कार्यावर परिणाम होऊन क्रेव्हींग होते.

६. PMS- pre menstral syndrome मुळे देखील हॉर्मोन्स बदलांमुळे क्रेव्हींग होते.

 

B.Sc.( nutrition),PGDD, M.Sc.DietieticsDiabetic Educator Counsulting dieticianसत्व आहार सल्ला केंद्र