Join us  

No high heels: उंच टाचांच्या चपला आम्हाला नकोत असं का म्हणतात जगभरात बायका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2021 4:46 PM

No high heels: महिलांमध्ये असणारं उंच टाचांच्या चपलांचं वेड एकदम का कमी होतंय.... जगभरात सुरु झालेला हा No high heels ट्रेण्ड नेमका आहे तरी काय...

ठळक मुद्देबऱ्याच महिन्यांनी जेव्हा अनेक जणींनी हाय हिल्स घातल्या तेव्हा प्रत्येकीला वेगवेगळे त्रास जाणवू लागले.

काही वर्षांपुर्वी अशी परिस्थिती होती, प्रत्येकीकडे किमान एक तरी हाय हिल्सचा (high heels) जोड असलाच पाहिजे. मग यामध्ये ती बॉक्स हिलवाली (box heel) चप्पल पण चालेल किंवा पेन्सिल हिल (pencil heel) असणारी सॅण्डलही चालेल. पण हाय हिल्स तुमच्याकडे नाहीत किंवा हाय हिल्स घालून तुम्हाला चालता येत नाही, म्हणजे मग तुम्ही फारच ओल्ड फॅशन आहात, असं समजण्याचा एक काळ होता. हा काळ काही फार जुना नाही. अगदी ४- ५ वर्षांपुर्वीचा. पण मग हाय हिल्सच्या जमान्यात हे अचानक काय झालं आणि हे कोणतं वेगळंच वारं वाहू लागलं..

 

काही काळापुर्वी स्टाईल (style)म्हणजेच हाय हिल्स असं एक अलिखित समीकरण झालं होतं. पण आता मात्र स्टाईलपेक्षा स्वत:चा कम्फर्ट लोकांना अधिक महत्त्वाचा वाटतो आहे. २०१८ पासून हाय हिल्सच्या विक्रीत जगभरातच सातत्याने घट होत आहे. त्यात कोविडनंतर २०२० या वर्षी तर जगभरातली हाय हिल्सची विक्री तब्बल ७१ टक्क्यांनी कमी (high heels sale downs in year 2020) झाली. या तुलनेत स्निकर्सची विक्री मात्र ३७ टक्क्यांनी वाढली आहे. कोविडनंतर (covid 19) हाय हिल्स वापरण्याचं प्रमाण एवढं झपाट्याने कमी का झालं, याची कारणे देताना असं सांगण्यात आलं आहे की कोविड काळात अनेक जणींचं घराबाहेर पडणं जवळपास बंद झालं होतं. अजूनही अनेक जणींचं वर्क फ्रॉम होम (work from home) सुरू आहे.

 

कोणतंही सेलिब्रेशन, पार्टी असं सगळं कोविड काळात जवळपास बंद होतं. त्यामुळे ज्या महिला यापुर्वी नियमितपणे हायहिल्स वापरायच्या, त्यांचा वापर आपोआपच कमी झाला आणि हळूहळू हाय हिल्सची सवय तुटत गेली. बऱ्याच महिन्यांनी जेव्हा अनेक जणींनी हाय हिल्स घातल्या तेव्हा प्रत्येकीला वेगवेगळे त्रास जाणवू लागले. त्याचवेळी कॅज्यूअल फुटवेअरमध्ये अनेक जणींना अधिक आरामदायी वाटू लागलं. त्यामुळेच २०२० साली एकीकडे हाय हिल्सची मागणी झपाट्याने खालावली तर त्याच वेळी दुसरीकडे स्निकर्सच्या मागणीत मात्र चांगलीच वाढ झाली होती. 

 

हाय हिल्स घातल्याने हे त्रास होऊ शकतातHealth issues due to high heels- पाठदुखी- कंबरेत वेदना- पाठीच्या मणक्याचा आकार बिघडणे- गुडघ्यांचा त्रास- पायाचा घोटा आणि तळपाय वारंवार दुखणे- अनेक जणींना हायहिल्समुळे डोकेदुखीचा त्रासही होतो. 

 

हाय हिल्सबाबत या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?Interesting facts about high heels- सध्या महिलांच्या फॅशन वर्ल्डमध्ये एक स्टाईल स्टेटमेंट असणाऱ्या हाय हिल्स या मुळी महिलांसाठी बनविलेल्या नव्हत्याच.  त्या पुरुषांसाठी होत्या. पुरुषांना घोडेस्वारी करण्यासाठी उपयुक्त ठरावीत म्हणून उंच टाचांचे बुट त्यांच्यासाठी बनविण्यात आले होते. कारण सुरक्षेच्या दृष्टीने ते अतिशय मजबूत मानले जायचे. त्यामुळे १० व्या शतकात उंच टाचांचे बुट पुरुष वापरायचे. - त्यानंतर पर्शियामधून हाय हिल्स असणारे बुट जेव्हा युरोपमध्ये गेले तेव्हा हळूहळू ते श्रीमंत आणि राज घराण्यातल्या लोकांचे आवडीचे बनत गेले. एवढेच नाही तर फ्रान्सच्या राजाने त्यांची उंची कमी होती म्हणून उंच टाचांच्या बुटांचा वापर सुरू केला. - १७४० नंतर मात्र या उंच टाचांवर महिलांची नजर पडली आणि त्यांनी पुर्णपणे त्यावर कब्जा केला. आता तर अशी परिस्थिती आहे की उंच टाचा या केवळ महिलांची फॅशन म्हणून ओळखल्या जातात.   

टॅग्स :सोशल व्हायरलफॅशनकोरोना वायरस बातम्या