Join us

IAS टिना डाबीनाही पुस्तकांच्या शॉपिंगचं वेड! पुस्तकांचा सेल लागला की.. त्या सांगतात आपला छंद आणि आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2022 12:39 IST

Viral Video Of IAS Officer Tina Dabi Shopping :पुस्तक वाचायलाच वेळ नाही असं म्हणत असाल तर वाचनाचं वेड काय असतं हे पाहा..

ठळक मुद्देत्यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ १ लाख ४० हजार जणांनी पाहिला आहे.पुस्तकांचे दुकान किंवा स्टॉल पाहिल्यावर त्यांना पुस्तके घेण्याची इच्छा होते आणि त्या ती मनसोक्तपणे खरेदीही करतात.

आयएएस ऑफीसर टिना डाबी (IAS Officer Tina Dabi) सोशल मीडियावर कायम अॅक्टीव्ह असतात. टिना डाबी यांची सध्या राजस्थानातील जैसलमेर येथे डिस्ट्रीक्ट कलेक्टर आणि मॅडिस्ट्रेट म्हणून नियुक्ती झालेली आहे. टिना डाबी आपल्या कामाच्या बाबतीत अतिशय चोख आहेत. तीन महिन्यापूर्वीच त्यांचे लग्न झाले असून उच्च शिक्षण विभागात सचिव असलेल्या आयएएस प्रदिप गवांडे (IAS Pradeep Gawande) यांच्यासोबत त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. हे दोघेही आपल्या कामात व्यस्त असले तरी टिना डाबी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमी काही ना काही फोटो, व्हिडिओ अपडेट करत असतात. 

(Image : Google)

टिना यांना पुस्तकं वाचायला खूप आवडतं, जेव्हाही त्या पुस्तकं पाहतात तेव्हा त्या खूप खूश होतात. त्यांना जेव्हा जेव्हा मोकळा वेळ मिळतो तेव्हा त्या पुस्तके वाचणे पसंत करतात. पुस्तकांचे दुकान किंवा स्टॉल पाहिल्यावर त्यांना पुस्तके घेण्याची इच्छा होते आणि त्या ती मनसोक्तपणे खरेदीही करतात. फेब्रुवारी २०१९ मध्य़े टिना यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एका पुस्तकांच्या दुकानात त्या पुस्तके खरेदी करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांच्या हातात भरपूर पुस्तके तर दिसत आहेतच पण या पुस्तकांवर ५० टक्के डिस्काऊंट असल्याचेही दिसत आहे. 

या व्हिडिओला कॅप्शन देताना त्या म्हणतात, माझा आनंद तेव्हा वाढतो जेव्हा पुस्तकांच्या किंमती अर्ध्या असतात. अनेकांनी त्यांच्या या व्हिडिओचे कौतुक करत व्हिडिओवर प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. काहींनी त्यांना ब्रेन विथ ब्यूटी म्हटले आहे तर काहींनी अशाप्रकारे कमी किंमतीत पुस्तके खरेदी करणे खरंच किती आनंदाची गोष्ट असते असे म्हटले आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलखरेदी