Join us  

प्रजासत्ताक दिन विशेष: बांगडीने काढा ३ सुबक सुंदर रांगोळ्या- १० मिनिटांत करा सुंदर सजावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2024 1:27 PM

Republic day rangoli design : सकाळच्या घाईत सुंदर रांगोळी काढण्याचं पाहा टेक्निक, रांगोळी काढता न येणारेही काढू शकतात झटपट

भारत यावर्षी ७४ वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा करणार आहे. प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रत्येक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यासह सकाळी भारताचा झेंडा अभिमानाने फडकावला जातो. ध्वज फडकविण्यापूर्वी त्याच्या भोवतीने सुंदर रांगोळी काढली जाते. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप महत्व आहे (Rangoli Design).

विशेष प्रसंग असल्यावर आपण दाराबाहेर रांगोळी काढतोच. प्रत्येकाला वाटते आपली रांगोळी इतरांपेक्षा हटके असावी, वेगळी डिझाईनची असावी (Social Viral). जर आपल्यालाही हटके पद्धतीची पण आकर्षक रांगोळी काढायची असेल तर, फक्त बांगडीचा वापर करून सुबक रांगोळी काढा(Republic day rangoli design).

तिरंगा डिझाईन

प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण घराबाहेर तिरंगा डिझाईनची रांगोळी काढू शकता. यासाठी ८ ते १० बांगड्या एकावर एक करून गोलाकाराने ठेवा. त्यानंतर त्यात भगवा, पांढरा, निळा आणि हिरवा रंग भरून सुंदर-सिंपल रांगोळी काढा.

प्रजासत्ताक दिन विशेष : घरीच करा पांढराशुभ्र कलाकंद, दुधाचा अगदी सोपा झटपट पदार्थ

सैनिक डिझाईन

बांगड्यांचा वापर करून आपण सैनिक डिझाईन काढू शकता. यासाठी एकावर एक बांगडी ठेवा. कडेने वेल, किंवा फक्त तिरंगा रंग भरा. आपण रांगोळीच्या मध्यभागी एक सैनिक काढू शकता. जर आपल्याला रांगोळीने सैनिक काढायला जमत नसेल तर, खडूने सैनिक काढा, आणि त्यात रंग भरा.

केस घनदाट-त्वचा उजळ हवी? मग खोबरेल तेलात मिसळून लावा २ जादुई गोष्टी, रुप उजळेल

भारताचा ध्वज

जर आपल्याला बांगड्याचा वापर करून डिझाईन काढायची नसेल तर, भारताचा तिरंगा काढा. त्यात भगवा, पांढरा, निळा आणि हिरवा रंग भरा. रांगोळीच्या भोवतीने आपण विविध डिझाईन काढू शकता. यामुळे रांगोळीची आणखीन शोभा वाढेल.

टॅग्स :प्रजासत्ताक दिन २०२४रांगोळीसोशल व्हायरल