Join us  

रासबेरीची मॅगी की मॅगी रासबेरी आइस्क्रिम? बघा हा व्हिडिओ, तुम्हीच ठेवा आता पदार्थाला नावं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2022 3:20 PM

Viral Video Of Maggi Raspberry Ice Cream: मॅगीसोबत केलेला हा आणखी एक विचित्र प्रयोग पाहून नेटीझन्स पुन्हा वैतागले आहेत. बघा ही रेसिपी (food and recipe) आणि आता तुम्हीच ठरवा या पदार्थाचं नाव.

ठळक मुद्देमॅगी टाकून हे लोक काय काय बनवू शकतील, याची कल्पनाही करवत नाही. आता सध्या सोशल मिडियावर असाच एक मॅगीसोबत केलेला प्रयोग व्हायरल झाला आहे. 

कमी वेळात तयार होणारा अतिशय सोपा आणि खूपच जास्त यम्मी असणारा पदार्थ म्हणजे मॅगी (Maggi Raspberry ice cream). त्यामुळेच तर अगदी शाळकरी मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळेच जण मोठ्या आनंदाने मॅगी खाताना दिसतात. म्हणूनच तर स्वस्तात मस्त आणि चवीला उत्कृष्ट असा पदार्थ म्हणून मॅगीचं नाव चटकन ओठांवर येतं. आता याच मॅगीसोबत मात्र काही जण खूपच वेगवेगळे आणि मुख्य म्हणजे अतिशय विचित्र प्रयोग (Weird Food Combination with maggi) करताना दिसतात. मॅगी टाकून हे लोक काय काय बनवू शकतील, याची कल्पनाही करवत नाही. आता सध्या सोशल मिडियावर असाच एक मॅगीसोबत केलेला प्रयोग व्हायरल झाला आहे. 

 

radiokarohan या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नेमक्या कुठल्या गावात हा अचाट प्रयोग केला जातोय, हे काही त्यावरून कळत नाहीये.

पितृपक्ष : स्वयंपाकात दहीवडे करताना लक्षात ठेवा ५ टिप्स, दहीवडे होतील मऊ लुसलुशीत 

पण तुम्हाला जर हा व्हिडिओ पाहून अशी मॅगी खावी वाटली तर अगदी घरीसुद्धा तुम्ही ती करू शकता. या व्हिडिओमध्ये मॅगी आणि रासबेरी आइस्क्रिम या दोन पदार्थांचं मोठं विचित्र कॉम्बिनेशन करण्यात आलं आहे. हे दोन्ही पदार्थ ज्या लोकांचे आवडीचे आहेत, ते लोक तर हा व्हिडिओ पाहून खरोखरंच खूपच संतापतील.

 

तर या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की एका शेफने एक मोठी कढई गॅसवर ठेवली. आपण मॅगी करताना जसं त्यात पाणी, मॅगी मसाला आणि मॅगी टाकतो, तसं सगळं केलं. इथपर्यंत तर सगळं ठीक होतं.

मक्याचं कणीस नेहमीच भाजून खातो, आता करा मक्याच्या किसाचा पारंपरिक उपमा; चव अशी बहारदार की..

पण जशी मॅगीला उकळी येऊ लागली, तसं त्याने त्यात रासबेरी आईसकॅण्डी टाकली. मॅगीसोबत रासबेरी आईस्क्रित चांगलं एकजीव झालं आणि मग ते एका कोनात घालून सर्व्ह केलं. चवीला हा पदार्थ कसा लागतो, हे तर खाऊनच ठरवावं लागेल. पण हा व्हिडिओ पाहून या पदार्थाला काय नाव द्यायचं, हे प्रत्येकाने आपलं आपण ठरवावं.. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलअन्नमॅगीमॅगी