Join us  

पंतप्रधान ऋषी सुनक करतात घरकाम -आवरतात भांडी! त्यांना घरासाठी वेळ मिळतो तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2024 4:25 PM

घरकाम करणं आजही कमीपणाचं मानलं जातं, पण उच्चपदस्थ असूनही नवराबायकोनं आपल्याच घरातली कामं करणं यात कमीपणा किंवा विशेष ते काय?

ठळक मुद्देघर आपलं, त्यातली चार कामं स्त्री किंवा पुरुषाने केली तर ते खरंतर स्वाभाविक म्हणायला हवं. मग तुमचं पद काहीही का असेना

नवरा घरकामात मदत करत नाही अशी काही बायकांची तक्रार असते. तर काहीजणी कौतुकानं सांगतात की माझ्या नवऱ्याला चहाही करता येत नाहीत. काही नवरे घरकामात मदत करतात तर त्याचं कौतुक म्हणजे घरकाम बाईनेच करायचं नवऱ्यानं मदत केली तरी फार असा एक समज. मुद्दा काय अजूनही घरात पुरुषानं काम करणं हे आपल्या समाजव्यवस्थेला मान्य नाही. आणि अशा वातावरणात जर एखाद्या देशाचा पंतप्रधान म्हणत असेल की मला भांडी घासायला आवडतात, ते काम मी करतो तर? चर्चा आहे इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची. एका मुलाखतीत खुद्द ऋषी सुनक यांनी आपल्याला घरातली कोणती कामं करायला आवडतात आणि आपण कोणती कामं स्वत:हून करतो हे सांगितलं. मुख्य म्हणजे  त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांनीही मान्य केलं की ते ही कामं करतात. आता यावरुन चर्चा नसती झाली तरच नवल!

(Image : google)

ब्रिटनमधील 'ग्रेझिया मॅग्झिन' उच्चभ्रू दांम्पत्याची मुलाखत घेते. त्यात घरात कोण कसली जबाबदारी उचलतं, काम करतं याची चर्चा झाली. इंग्लंडचे पंतप्रधान  ऋषी सुनक यांना विचारण्यात आलं की तुम्हाला घरातलं कोही आपली अतिशय आवडीची कामं असल्याचं सांगितलं. हे सांगताना सुनक यांनी आपल्या पत्नीची एक जुनी वाईट सवयही यावेळी सांगितली. पूर्वी अक्षता यांना गादीवर बसून खाण्याची सवय होती. ही सवय सुनक यांना अजिबात आवडायची नाही. गादीवर प्लेट दिसली की, 'किती किळसवाणा हा प्रकार... आता पुन्हा असं करु नको' अशी कुरकुर ते करायचे.सुनक यांना स्वयंपाक करायलाही खूप आवडतो, पण तो करायला मात्र त्यांना अजिबातच वेळ मिळत नाही. तरीही ही हौस आपण शनिवारी सकाळचा नाश्ता तयार करुन भागवतो असं ते सांगतात.पंतप्रधानपदाची जबाबदारी असलेला माणूस घरात इतक्या कामांमध्ये मदत करतो, पुढाकार घेतो हे विशेष वाटूच शकतं. पण घर आपलं, त्यातली चार कामं स्त्री किंवा पुरुषाने केली तर ते खरंतर स्वाभाविक म्हणायला हवं. मग तुमचं पद काहीही का असेना, अर्थात इतका समंजस स्वीकार आपल्याकडे विरळाच.

टॅग्स :ऋषी सुनकइंग्लंड