Join us  

जास्त मेकअप केला तर आई खूप रागावते! पलक तिवारी सांगतेय, आईच्या शिस्तीचा धाक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2023 6:08 PM

Shweta Tiwari Warned Palak Tiwari For Her Heavy Makeup: अभिनेत्री असली म्हणून काय झालं... खूप मेकअप झाला तर अभिनेत्री पलक तिवारी हिलाही तिच्या अभिनेत्री आईचे म्हणजेच श्वेता तिवारीचे बोलणे खावे लागतात....

ठळक मुद्देती नेहमी म्हणते तु लहान आहे, यंग दिसतेस... तशीच राहा, उगाच खूप जास्त मेकअप करून प्रौढ दिसू नकोस.

काही मोजके अपवाद साेडले तर बहुतांश मुलींना मेकअपचं वेड असतंच. अगदी लहान लहान चिमुरड्या मुलीही त्यांच्या आईचं मेकअपचं सामान घेऊन आईपासून लपून- छपून मेकअप करतात. असा मजेशीर अनुभव लेक असणाऱ्या बहुतांश आईंनी घेतलाच असणार. पलक तिवारी आणि तिची आई श्वेता तिवारी (Shweta Tiwari's daughter Palak Tiwari) या माय- लेकीचंही तसंच आहे. पलक आज अभिनेत्री म्हणून ओळखली जात आहे. पण तरीही तिने किती मेकअप करावा, मेकअपसाठी कोणते प्रोडक्ट वापरावेत, यावर तिच्या आईचा कटाक्ष असतोच...(Palak Tiwari reveals that mom Shweta Tiwari is very strict about Palak's makeup)

 

'किसी का भाई किसी की जान' च्या माध्यमातून पलकने अभिनेत्री म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. पलकची ईटाईम्स तर्फे नुकतीच एक मुलाखत घेण्यात आली.

वयाच्या चाळीशीत ट्विंकल खन्ना पुन्हा कॉलेजात, मास्टर्स पूर्ण करत म्हणाली, सोपे नव्हते काही कारण...

यामध्ये पलकला तिच्या ब्यूटी टिप्सविषयी, मेकअपविषयी विचारले असता तिने श्वेता तिवारीचे मेकअप रुल्स सगळ्यांना सांगितले. स्वत: अभिनेत्री आहे, मुलगीही अभिनेत्रीच आहे, त्यामुळे श्वेता पलकला मेकअप करण्यासाठी आठकाठी करत असेल, असं वाटत नाही. पण पलक म्हणते की आई माझ्या मेकअपच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहे. मेकअप थोडा जरी हेवी झाला तरी ती मला रागावते.

 

तिच्यामते मी वयाने लहान आहे. त्यामुळे मी कमीच मेकअप केला पाहिजे. ती नेहमी म्हणते तु लहान आहे, यंग दिसतेस... तशीच राहा, उगाच खूप जास्त मेकअप करून प्रौढ दिसू नकोस.

काजोलच्या आयुष्यातील ३ अत्यंत महत्वाच्या व्यक्ती, ती म्हणते, त्यांच्याशिवाय माझे काय झाले असते..

माझ्या वयानुसार मी कोणते कॉस्मेटिक्स वापरायला हवेत, हे आईला बरोबर ठाऊक असतं. त्यामुळे आईच्या सांगण्यानुसार मी माझ्या वयाला योग्य ठरतील असेच प्रोडक्ट्स वापरते, असंही पलकने नमूद केलं. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलश्वेता तिवारीपलक तिवारीमेकअप टिप्स