Join us  

स्मार्टफोनचा स्क्रीन सतत खराब होतो, बिघडतो, तडे जातात? ५ उपाय-फोन टिकेल चांगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2024 8:30 AM

लहान मुलांच्या हातात फोन सतत असणं म्हणजे फोन बिघडण्याची सुरुवातच, काय काळजी घ्याल?

घरोघरी महिलांचे फोन पाहा. त्यातही ज्यांचे मुलं फोन हाताळतात. जेवताना चिकट हात लावतात, खरकटं पडतं, वाट्टेल तसा फोन पडतो. तडे तर अनेक गेलेले असतात. बायका तसेच फोन वापरतात. नाईलाज असतो कारण लहान मुलं फोन घेतातच. त्यांना देऊ नये असं सगळे सांगतात, पण ते घेतात. पाण्यात पाडतात. ओले करतात. हातातून फोन पाडतात. त्यावर खेळणीही ठेवतात. तात्पर्य काय आईच्या फोनची अवस्थे बिकट होते. त्यात आजकाल जमाना टचस्क्रीनचा. तो इतका नाजूक की लगेच काम बंद आंदोलन करतो. तर आता त्यातल्या त्यात प्रयत्न करायचे की आपल्या टच स्क्रिन फोनची काळजी कशी घ्यायची. 

(Image : google)

काय करता येईल?१. लहान मुलांच्या हातात फोन देऊच नका. आणि ते वापरत असतील तर उत्तम दर्जाचा स्क्रिन गार्ड वापरा. ते तातडीनं करायला हवं.२. फोन वापरताना बोटानं स्क्रोल करण्याची सवय लावा अनेकजण नखं वापरतात. नखांच्या टोकांनीही टचस्क्रीन खराब होतो.आपल्यापैकी अनेकांना मोबाईल वापरताना नखाने टचस्क्रीन वापरायाची सवय असते. टचस्क्रीन हे बोटांसाठी बनविलेले आहे त्यामुळे नखांचा वापर हा टचस्क्रीनवर व्हायलाच नको. त्यामुळे टचस्क्रीन खाब होऊ शकतो.

३. फोन तापू देऊ नका. अनेकदा फोन गाडीत राहतो, गरम होतो. त्यामुळे स्क्रीन खराब होतो. ४. फोन नियमित मऊ फडक्यानं पुसा, त्यावर डाग पडता कामा नये.५. स्क्रिन गार्ड, मोबाइल कव्हर खराब झाले तर ते वेळेत बदला. 

टॅग्स :स्मार्टफोनमोबाइल