Join us  

फटाके फोडताना दुखापत होऊ नये म्हणून ८ गोष्टींची काळजी घ्या, दिवाळीत संकट टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2023 11:11 AM

Safety Tips For Crackers in Diwali: फटाके फोडा, पण त्या आधी या काही गोष्टींची काळजी घ्या. (How to enjoy crackers safely in diwali?)

ठळक मुद्देदिवाळीच्या आनंदावर विरजन पडू नये, म्हणून फटाके फोडताना या काही गोष्टींची नक्कीच काळजी घ्या....

दिवाळी म्हणजे जसा दिव्यांचा सण- उत्सव असतो, तसेच तो एकप्रकारे फटाक्यांचा, आतिषबाजीचा धमाकाही असतो. बाजारात या दिवसांत अनेक वेगवेगळे फटाके मिळतात. त्यामुळे मग मुलांसाठी आणि आपल्याही हौशीसाठी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फटाके आणतो आणि उडवतो (How to take care of yourself while enjoying crackers). पण दिवाळीनंतर भाजल्याच्या, घरातलं काही जळाल्याच्या अनेक घटना आपण ऐकतो. असं काही आपल्या घरी हाेऊन दिवाळीच्या आनंदावर विरजन पडू नये, म्हणून फटाके फोडताना या काही गोष्टींची नक्कीच काळजी घ्या....(How to keep your self safe from crackers)

 

फटाके फोडण्यापुर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फटाके उडविण्याआधी सगळ्यांनी पायात कंम्पलसरी चपला घालाव्या.. कारण फटाक्यांच्या ठिणग्यांवर पाय पडून चटका बसू शकतो. चपला व्यवस्थित मापाच्या नसतील तर बूट घाला. कारण फटाका लावून पळताना चपलेत पाय अडकून पडण्याची शक्यता असते. 

फक्त अर्ध्या तासात करा विकतसारखी चवदार काजूकतली, फराळ खाऊन कंटाळलेलेही मागतील पुन्हा पुन्हा

२. महिलांनी ओढणी, साडीचा पदर या गोष्टी व्यवस्थित बांधून, खोचून घ्याव्या. शक्य असेल तर ओढणी काढूनच किंवा व्यवस्थित पिनअप करूनच फटाके उडवा.

३. दिवाळीला लहान मुलींना आपण सिल्कचे, घेरदार, भरजरी ड्रेस घेतो. पण हे ड्रेस त्यांना सावरता येत नाहीत. त्यामुळे हे ड्रेस फक्त फोटोशूट पुरतेच ठेवा. फटाके फोडायला जाण्यापुर्वी मुलांना ड्रेस बदलायला लावा आणि साधे, घेरदार नसलेले कपडे त्यांना घालायला द्या.

 

४. रॉकेट लावणार असाल तर ते शक्यतो गच्चीवर किंवा गल्लीच्या बाहेर जाऊन मोकळ्या मैदानात लावा. म्हणजे ते कुणाच्याही घरात जाऊन फुटणार नाही. 

५. सुरसुरीने काेणताही फटाका लावू नका. कारण सुरसुरीच्या उजेडात फटाक्याची वात केव्हा पेटते हे लक्षात येत नाही. त्यामुळे फटाके लावण्यासाठी नेहमी लांब उदबत्तीचाच वापर करा.

दारासमोर पणतीची रांगोळी काढायची? बघा एकापेक्षा एक सुंदर ७ डिझाईन्स, काढा सुबक- सुंदर पणती

६. काही जण जमिनीवर फटाका ठेवतात. पण लवंगी फटाके, बॉम्ब असे फटाके फोडताना ते शक्यतो थोडे उंचावर ठेवा. कारण तुम्ही वाकून फटाका लावता तेव्हा तुमचा चेहरा फटाक्यावर असतो, फटाका पेटला आणि तुमच्या लक्षात आलं नाही तर चेहऱ्याला, डोळ्यांना दुखापत होऊ शकते.

दिवाळीत दिव्यांसोबत फोटो काढता पण कधीच चांगले येत नाहीत? ७ सोप्या पोझ, लाइक्सचा पडेल पाऊस

७. दिवे किंवा पणत्या लावताना त्याच्या शेजारून एखादी लाईटची वायर गेलेली नाही ना, हे एकदा तपासा.

८. फटाका लावून तुम्ही जिथे उभे राहणार त्या रस्त्यात एकही पणती, दिवा ठेवू नका. 

 

टॅग्स :दिवाळी 2023फटाके