Join us

एका मिनिटांत होतील चकाचक बाथरुममधले कळकट-मेणचट नळ, पाहा ३ सोप्या ट्रिक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2025 13:09 IST

How To Clean Bathroom Tap: Clean Bathroom Taps: How to do Home Easy tap Cleaning routine Tips and Tricks: How To Clean Your Taps: Best Tips for Cleaning Bathroom Taps: 3 bathroom cleaning hacks: Does candle wax remove hard water stains: नळांवर गंजाचे आणि पांढरे डाग दिसत असतील तर तुम्ही ही सोपी ट्रिक्स वापरु शकता.

कामाच्या वाढत्या व्यापामुळे गृहिणींना घरातील अनेक छोट्या गोष्टींकडे फारसे लक्ष देता येत नाही.(Does candle wax remove hard water stains) त्यामुळे घरात अनेक ठिकाणी घाण जमते. आपल्या प्रत्येकाच्या घरात नळ असतात. त्याच्यावर पाण्याचे थेंब साचले की, त्यांना गंज चढू लागतो किंवा ते अधिक काळपट पडतात. घाणेरडे नळ साफ करण्यासाठी आपल्याला अधिक मेहनत करावी लागते. (How to do Home Easy tap Cleaning routine Tips and Tricks) तरीदेखील ते नव्यासारखे चमकत नाही. नळांवर गंजाचे आणि पांढरे डाग दिसत असतील तर तुम्ही ही सोपी ट्रिक्स वापरु शकता.(How To Clean Bathroom Tap)ज्यामुळे नळ नव्यासारखे होऊन चकाचक चमकतील. यासाठी तुम्हाला फारसा खर्च देखील करावा लागणार नाही जाणून घेऊया सोप्या ट्रिक्स 

1. नळांवरील डाग कसे काढाल?

नळांवरील पाण्याचे डाग किंवा गंज काढण्यासाठी मेण वापरणे फायदेशीर ठरतं. त्यासाठी सर्वात आधी नळ स्वच्छ धुवून पाणी पुसून तो कोरडा करा. नंतर त्यावर मेणाचा पातळ थर लावा. मेणाच्या वापरामुळे नळावर थर तयार होतो, ज्यामुळे पाण्याचे डाग आणि गंज रोखण्यास मदत होते. त्यानंतर मेणाने नळाला घासून घ्या आणि कोरड्या कपड्याने पुसा. 

2. बेकिंग सोडा आणि चुना

आपल्या घरात बेकिंग पावडर हा नेहमी वापरला जातो. याच्या मदतीने तुम्ही नळ स्वच्छ करु शकता. यासाठी आपल्याला १ चमचा बेकिंग सोडामध्ये १/२ चमचा चुना घालायला हवा. त्याची पेस्ट तयार करुन ५ मिनिटे नळावर राहू द्या. स्क्रबरच्या मदतीने नळ घासून घ्या. असे केल्याने डाग आणि गंज कमी होण्यास मदत होईल. 

3. कोमट पाणी आणि मीठ 

गरम पाण्याच्या मदतीने तुम्ही नळांसह अनेक गोष्टी स्वच्छ करु शकता. त्यासाठी आपल्याला कोमट पाण्यात १ चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. त्या पाण्यात कापड ओले करुन त्या पाण्याने नळ स्वच्छ करा. त्यामुळे नळावरील पाण्याचे डाग आणि गंज काही प्रमाणात कमी होईल.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरल