Join us  

होगी रिहाना , होगी बेयॉन्से, साड्डी ता ऐ है, करीना.. दिलजित असे म्हणाला आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2024 6:13 PM

'Hogi Rihanna Hogi Beyonce': Diljit Dosanjh praises Kareena Kapoor with 'Proper Patola' song : दिलजीतने स्तुती करताच करिना सुरेख लाजली; सैफ अली खान आला दोघांच्यामध्ये आणि..

बॉलीवूड बेबो अर्थात करिना कपूर (Kareena Kapoor) आपल्या अदाकारीसाठी ओळखली जाते. तिचा चाहतावर्ग फार मोठा आहे. तिने नुकतंच अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यात हजेरी लावली. या सोहळ्यादरम्यान, तिने काळ्या रंगाची सुंदर सिक्विन साडी नेसली होती. करिनासह इतर कलाकारांनीही आपल्या स्टायलिश अंदाजाने चारचांद लावले. विशेष म्हणजे या सोहळ्यादरम्यान, पंजाबी गायक दिलजीत दोसांझचा (Diljith Dosanjh) स्टेज परफॉर्मन्स लक्षवेधी ठरला. कारण त्याने करिनाला स्टेजवर बोलावून हटक्या प्रकारे स्तुती केली, जे ऐकून ती सर्वांसमोर सुरेख लाजली (Social Viral).

यावेळी दिलजीतने करिनासाठी खास गाणंही गायले. त्याच्या गाण्यावर ठुमके लावत करिनाने मैफल रंगवली('Hogi Rihanna Hogi Beyonce': Diljit Dosanjh praises Kareena Kapoor with 'Proper Patola' song).

अंबानीच्या लेकाच्या लग्नात रिहाना करणार परफॉर्म; पण रिहाना नक्की आहे तरी कोण? तिची संपत्ती किती?

दिलजीतच्या एका स्तुतीने सर्वांसमोर लाजली करीना

अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग पार्टीत दिलजीत दोसांझने परफॉर्म केले. गाणं सादर करत असताना त्याने मध्येच करिनाला स्टेजवर बोलावले. तिच्यासह सैफ आली खान देखील दिसत आहे. दिलजीतने करिनाला स्टेजवर बोलावल्यानंतर करिनाला सर्वांसमोर, 'होंगी रिहाना और होंगी बियॉन्से, हमारी तो करीना हैं' म्हणजेच रिहाना असो किंवा बियॉन्से आमच्यासाठी करिना सगळं काही आहे. ही स्तुती ऐकताच करिना सर्वांसमोर सुरेख लाजली.

दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची आई पन्नाशीत प्रेग्नंट, कुणी केलं ट्रोल तर कुणी म्हणाले..

यादरम्यान, दिलजीतने तिच्यासाठी खास गाणंही गायले. 'प्रॉपर पटोला' या गाण्याचे बोल ऐकताच करिना स्वतःला ठुमके लावण्यापासून रोखू शकली नाही. तिचे ठुमके पाहून सर्वांनी तिच्या मुव्ह्सचे कौतुक केले. शिवाय टाळ्या वाजवून तिला ठुमके लावण्यास प्रोत्साहित केले. दिलजीतने हा खास व्हिडिओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला असून, व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. 

टॅग्स :करिना कपूरदिलजीत दोसांझसोशल व्हायरल