Join us  

मुलांनी खडू, पेन्सिलने भिंत रंगवली? भिंतीवरचे रंगबिरंगी डाग घालवण्याची १ सोपी ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2024 3:54 PM

Easy Hack to remove chock or color pencil marks from wall : भिंतीवर गिरगोट्या काढल्याने भिंत खराब होते आणि दिसायलाही ते खराब दिसते.

लहान मुलं अनेकदा जे करायला नको तेच करुन ठेवतात हे ज्यांना लहान मुलं आहेत त्यांना वेगळं सांगायला नको. एकदा मूल वर्षाचे झाले आणि ते चालायला आणि धावायला लागले की त्याच्याकडे लक्ष देणं हे एक महत्त्वाचं काम होऊन जातं. मुलांना सतत काही ना काही उद्योग करायचे असतात आणि त्यांच्या या उद्योगांनी आपण मात्र पुरते थकून जातो. सतत कुठेतरी चढायचं, काहीतरी ओढायचं, सांडायचं असं सगळं सुरू झालं की ते आवरता आवरता आपल्या नाकात दम येतो.  मुलांच्या हाताला आणि बोटांना थोडी पकड आली की ते समोर दिसेल ती गोष्ट घेतात आणि त्याने भिंतीवर गिरगोच्या काढायला सुरुवात करतात. मग त्यांच्या हाती लागेल ते पेन्सिल, खडू, पेन असे काहीही त्यांना चालते (Easy Hack to remove chock or color pencil marks from wall). 

भिंतीवर गिरगोट्या काढल्याने भिंत खराब होते आणि दिसायलाही ते खराब दिसते. मुलांना असे करु नका असे बरेचदा सांगूनही ते आपले लक्ष नसताना वारंवार तसे करत राहतात. मुलं इतकी लहान असतात की त्यांना या वयात सांगून, ओरडूनही समजेल असे सांगता येत नाही. लहान मूल असणाऱ्या बहुतांश घरांमध्ये ही समस्या दिसून येत असल्याने  तसेच आपण दिलेला रंग  महागाचा असेल तर तो लगेच देणे शक्य नसते. काहीवेळा आपण भाड्याने घर घेऊन राहत असतो, तिथली भिंत खराब झाली तर घरमालक ओरडण्याची शक्यता असते. त्यामुळे हे डाग वेळच्या वेळी काढायचे असतील तर त्यासाठी १ सोपी ट्रिक आज आपण पाहणार आहोत. यासाठी आपल्या घरात सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर आपण करणार आहोत.  

(Image : Google)

१. एखादा खराब झालेला टूथब्रश घ्यायचा आणि त्यावर पेस्ट लावायची. 

२. आपण या ब्रशने ज्याप्रमाणे दात घासतो त्याप्रमाणे भिंत ब्रशने घासायची.

३. घासल्यानंतर लगेच ओले असतानाच एखादा सुती कपडा ओला करुन त्याने हा ब्रशने घासलेला भाग पुसून घ्यायचा. 

 

४. यामुळे भिंतीवरचे पेन्सिलचे, खडूचे डाग सहज निघून जाण्यास मदत होते. 

५. अगदी झटपट होणारा आणि सोपा उपाय असल्याने यासाठी फारसे काही करावेही लागत नाही.   

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडी