Join us  

नटूनथटून साडी नेसून कुणी पायात बूट घालतं का? साडी विथ स्निकर्स, आता विसरा नाजूक चपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2021 2:19 PM

साडीवर हिल्स घालून मटकणे सोडा, भरजरी साडीवर बूट घालायचा काय आहे नवीन ट्रेंड...

ठळक मुद्देपाहा काय आहे ही नवीन आगळीवेगळी फॅशन...तुम्ही घालाल का कधी असे साडीवर बूट?

साडी नेसायची म्हटली की केसांपासून ते पायातल्या चपलांपर्यंत तयारी असते. लग्नसमारंभ किंवा सणवार असला की कित्येक दिवस आधीपासून ही तयारी करण्यात आपण पार बुडून गेलेले असतो. साडी नेसायची म्हणजे सगळे कसे परफेक्ट असायला हवे. साडीवर सूट होतील अशा दागिन्यांबरोबरच त्यावर चांगल्या दिसतील अशा चपला किंवा सँडलची खरेदी होते. कधी हाय हिल्स तर कधी प्लॅटफॉर्म चप्पल साडीवरच्या लूकला आणखी खुलवतात. काहीच नाही तर एखादी डिझायनर नाजूक चप्पल तरी आपण साडीवर आवर्जून घालतो. साडी नेसली की ठुमकत, मटकत चालल्यामुळे सौंदर्यात आणखी भरच पडते. पण असे करण्याऐवजी कोणी साडीवर बूट किंवा स्निकर्स घातले तर? ऐकून काहीसे वेगळए वाटत असले तरी आता अशाप्रकारची फॅशन इन आहे. 

(Image : Google)

लग्नसमारंभात किंवा इतर कोणत्याही समारंभात दिवसभर एकतर साडी सांभाळायची. त्यावर थोडी स्टायलिश किंवा हिल्स असलेली वेगळी चप्पल त्यामुळे थोड्या वेळाने पाय दुखायला लागतात आणि आपल्यालाही कधी एकदा ही चप्पल काढतो असे होऊन जाते. त्यामुळेच स्वत:चा कम्फर्ट महत्त्वाचा हे लक्षात घेऊन किंवा एक वेगळी फॅशन म्हणून आता साडीवर बूट किंवा स्निकर्स घालायचा एक नवीनच ट्रेंड आला आहे. अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिचे नुकतेच साडीवर स्निकर घातलेले काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये तिने अतिशय छान रेशमी अशी जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. त्यावर साधासा मेकअप केलेली सान्या एका लग्नसमारंभात असल्याचे आपल्याला तिच्या फोटोवरुन दिसते. यामध्ये तिने गळ्यात एक मोत्याचा सेट घातला असून केसांचा आंबाडा बांधून त्यावर गजरा घातला आहे. इतके सगळे आवरल्यावर तिने पायात मात्र स्निकर्स घातले आहेत. हे स्निकर्स पांढऱ्या रंगाचे असून ते एकदम उठून दिसत आहेत. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सान्याने हे फोटो पोस्ट केले असून त्यामुळे तिने केलेल्या या आगळ्यावेगळ्या फॅशनची चर्चा होत आहे. 

याआधीही काही अभिनेत्रींनी अशाप्रकारची फॅशन केली होती. यामध्ये तापसी पन्नू, कंगना रनौत, समंथा रुथ प्रभू, जेनेलिया यांचा समावेश आहे. साडीमध्ये सहज वावरता यावे यासाठी ही फॅशन अगदीच चांगली असल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे हल्ली अनेक जणी आपला घागरा, साडी यांना मॅच होतील असे स्निकर्स तयारही करुन घेतात. त्यामुळे साडी नेसून तुम्ही हिल्स किंवा डिझायनर चप्पलच घालायला पाहिजे असे काही नाही तर ही हटके फॅशन तुम्हीही ट्राय करु शकता. 

(Image : Google)

टॅग्स :सोशल व्हायरलफॅशनखरेदीब्यूटी टिप्स