Join us  

दिवाणच्या बॉक्समध्ये भरुन ठेवलेल्या कपड्यांना कुबट वास येतो? ३ उपाय, न धुताच कपड्यांना येईल सुगंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2023 3:38 PM

How to Remove Musty Smell From Clothes in Bedbox?: दिवाणच्या बॉक्समध्ये ठेवलेल्या ठेवणीच्या कपड्यांना पावसाळ्यात (rainy days) अनेकदा कुबट वास येऊ लागतो. हा वास घालवायचा तर पुढील काही उपाय करून बघा.

ठळक मुद्देकपड्यांचा कुबट वास घालविण्यासाठी कपडे न धुताही घरच्याघरी काय उपाय करता येतील ते पाहूया...

आपल्या घरात असे बरेच कपडे असतात, जे आपल्याला रोजच्या रोज लागत नाहीत. त्यामुळे ते कपडे आपण एकतर दिवाण, सोफा यांच्या बॉक्समध्ये ठेवून देतो किंवा एखाद्या बॅगेत टाकून कपाटाच्या अगदी वरच्या कप्प्यात, माळ्यावर ढकलून देतो. महिनोंमहिने ते कपडे त्याच बंदिस्त ठिकाणी असतात. त्यामुळे मग त्यांना वास येऊ लागतो. एरवी फार जाणवलं नाही तरी पावसाळ्यात दमट हवामानामुळे त्या कपड्यांचा कुबट वास येऊ लागतो (How to Remove Musty Smell From Clothes in Bedbox?). म्हणूनच त्या कपड्यांचा कुबट वास घालविण्यासाठी कपडे न धुताही घरच्याघरी काय उपाय करता येतील ते पाहूया...(Tips for Getting Rid of Storage Odors in Clothing)

 

दिवाण बॉक्समधल्या कपड्यांचा कुबट वास घालविण्यासाठी उपाय१. बॉक्स उघडा ठेवाबॉक्समधल्या कपड्यांना कुबट वास येण्याचं एक मुख्य कारण म्हणजे तो बॉक्स कित्येक महिने उघडलाच जात नाही.

"मेनोपॉजसाठी शरीराची तयारी करायची तर....." समीरा रेड्डी सांगतेय मेनोपॉजच्या उंबरठ्यावर असताना नेमकं काय करावं....

त्यामुळे एक अख्खा दिवस दिवाणाचा बॉक्स उघडा ठेवा. बॉक्स जेव्हा उघडा करून ठेवाल, तेव्हा खोलीतले पंखे चालू ठेवा. खिडक्या- दरवाजे उघडे ठेवा. एका दिवसात वास कमी झाला नाही तर पुढचे २ ते ३ दिवस सलग हा प्रयोग करा. वास कमी होईल.

 

२. कपड्यांना ऊन दाखवापावसाळ्यातही बऱ्याचदा स्वच्छ ऊन पडतंच. असं मोकळं वातावरण जेव्हा असेल तेव्हा बॉक्समधले कपडे बाहेर काढा आणि त्यांना चांगलं ५ ते ६ तास ऊन दाखवा.

दिवसभर फ्रेश रहायचंय तर नाश्त्याला खा नाचणी डोसा! रेसिपी सोपी- घ्या प्रोटिन्स- फायबरचा सुपरडोस

बाहेर जर सतत पाऊस असेल तर कपडे घरातच मोकळे पसरून टाका आणि त्यावेळी पंखा लावा.

 

३. सुगंधी पदार्थांचा वापरडांबर गोळ्या, कापूराच्या गोळ्या एका कागदात गुंडाळा आणि तो कागद बॉक्समध्ये ठेवून द्या. कपड्यांचा कुबट वास कमी होतो.

धार बोथट झाली म्हणून कात्री फेकून देता? ३ उपाय, कात्रीला लावा चटकन तेज धार - ते ही फुकट

त्याशिवाय आणखी एक उपाय करता येईल. उदबत्ती, धूप यांची रिकामी झालेली पाकिटे बॉक्समध्ये ठेवून द्या. परफ्यूमची रिकामी बाटलीही झाकण न लावता बॉक्समध्ये ठेवून द्या. कपडे सुगंधी होतील.  

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्समोसमी पाऊस