Join us  

अनुष्काला बल्जिंग डिस्कचा त्रास, नेमका काय असतो हा आजार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 12:51 PM

मणक्याशी निगडीत असलेल्या या आजारामध्ये नेमका काय त्रास होतो, कोणते उपाय केल्यावर आराम मिळू शकतो याविषयी...

ठळक मुद्देपाठ, मान सतत दुखते अशी तक्रार करत असाल तर वेळीच डॉक्टरांना दाखवून घ्यामणक्याचा त्रास झाला की हालचालींवर मर्यादा येतात, त्यामुळे योग्य ती काळजी घ्यायला हवी...

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला काही वर्षांपासून बल्जिंग डिस्क हा आजार आहे. नुकताच तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून बाळंतपणानंतर तिला पुन्हा हा त्रास व्हायला लागला आहे. पाठीच्या मणक्याशी निगडित असलेल्या या आजारामुळे अनुष्काला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. या समस्येती सुरुवात पाठीच्या मणक्यापासून होते आणि त्याचा प्रभाव हळूहळू शरीराच्या अन्य भागांवरही व्हायला लागतो. अनुष्का मागील काही वर्षांपासून या समस्येवर वैद्यकीय उपचार घेत आहे. मात्र यावर वेळीच योग्य ते उपचार घेतले नाहीत तर हळूहळू संपूर्ण शरीरामध्ये वेदना व्हायला लागतात. सतत बसून किंवा एकाच पोझिशनमध्ये काम करणाऱ्यांना ही समस्या उद्भवू शकते. साधारणत: हा आजार ३० ते ५० वर्षे वयोगटातील लोकांना होतो. जे लोक यावर उपचार करत नाहीत त्यांना युरिन किंवा इंटेस्टाइनशी संबंधित आजार होण्याची शक्यता जास्त असते.

पाहूयात या आजारामध्ये नेमके काय होते....

1. बल्जिंग डिस्कला स्लीप डिस्क असेही म्हटले जाते. डिस्कचा बाहेरचा भाग स्पायनल कॅनालमध्ये फुगतो तेव्हा असे होते. 

2.हा फुगवटा मणक्याच्या कोणत्याही भागावर परिणाम करु शकतो. कधी हे दुखणे पाठीकडे सरकते तर कधी पायाच्या बाजूला सरकते. खांदे व हातामध्येही वेदना होऊ शकतात. 

3.सतत जड वस्तू उचलणे, सतत उभे राहून काम करणे, दिर्घ काळ गाडी चालवणे यांमुळे हा त्रास उद्भवू शकतो. 

4.लठ्ठपणा हेही या समस्येमागील एक कारण असू शकते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. 

5.एखादा अपघात झाला आणि मणक्याला मार बसला तर काही काळाने हा त्रास उद्भवू शकतो. 

6. हा त्रास झाल्यास मान, कंबरेचा खालचा भाग म्हणजेच पृष्ठभाग, स्नायू यांमध्ये वेदना होतात. 

7.अशक्तपणा आल्यासारखे वाटते आणि कोणतीही हालचाल करु नये असे वाटते. 

8.औषधोपचार, फिजिओथेरपी, काही सोपे व्यायामप्रकार हे यावरील मुख्य उपचार असतात. 

9.कालांतराने हा त्रास कमी होतो पण फरक पडलाच नाही तर मात्र शस्त्रक्रियाही करावी लागू शकते. 

10.आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करणे हा यावरील एक महत्त्वाचा उपाय आहे. 

11.आपले चालण्याचे, बसण्याचे आणि कोणतेही काम करण्याची पोश्चर योग्य असणे गरजेचे आहे, त्यामुळे या समस्येपासून तुम्ही काही प्रमाणात दूर राहू शकाल.

टॅग्स :सोशल व्हायरलअनुष्का शर्माविराट कोहलीपाठीचे दुखणे उपाय