Join us  

अनुष्का शर्माने वाढदिवसाला घातला ८५ हजारांचा ड्रेस, कॉटन आणि लिनन ब्लेंडच्या कापडाची खासियत अशी की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2022 6:55 PM

Anushka Sharma's Birthday Dress: अनुष्का शर्माने नुकताच तिच्या वाढदिवसाला घातलेला पांढऱ्या रंगाचा मिनी फ्रॉक पाहिला का? वाचा तब्बल ८५ हजारांच्या या ड्रेसमध्ये आहे तरी काय?

ठळक मुद्देअतिशय आरामदायी कपडा म्हणून कॉटन लिनन ब्लेंड कपडा ओळखला जातो. 

अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने नुकताच तिचा ३४ वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे, केकचे आणि तिचे व विरोट कोहलीचे काही बर्थ डे स्पेशल फोटो तिने नुकतेच सेाशल मिडियावर शेअर (instagram share) केले होते.. यासगळ्या फोटोंमध्ये लक्ष वेधून घेणारी एक गोष्ट म्हणजे अनुष्काने घातलेला तिचा खास ड्रेस (white dress of Anushka Sharma).. पांढऱ्या रंगाचा मेगा स्लिव्ह्ज असणारा तिचा हा मिनी फ्रॉक तब्बल ८५ हजार रुपयांचा आहे.

 

तिचा हा ड्रेस खूपच आकर्षक असला तरी वरवर पाहता अगदीच साधा वाटतो. म्हणजे या ड्रेसमध्ये ८५ हजारांचं एवढं काय आहे, असा प्रश्न तो ड्रेस पाहून साहजिकच कुणालाही पडू शकतो. कारण या ड्रेसवर ना कोणती एम्ब्रॉयडरी आहे ना कोणतं मोती- कुंदन वर्क करण्यात आलं आहे. समर कलेक्शनसाठी परफेक्ट असणारा हा ड्रेस खरोखरंच अनुष्काला एकदम कुल लूक देणारा तर आहेच, पण कुल ठेवणाराही आहे. त्यामुळेच तर तो एवढा महागडा आहे.

 

'या' कारणामुळे अनुष्काचा ड्रेस आहे महागडाअनुष्काचा हा पांढऱ्या रंगाचा ड्रेस Zimmermann य ब्रँडने डिझाईन केला असून या ड्रेससाठी खास कॉटन लिनन ब्लेंड (cotton-linen blend) कपडा वापरण्यात आला आहे. या कपड्यामुळेच अनुष्काच्या ड्रेसची किंमत ८५ हजारांच्या घरात गेली आहे. कॉटन लिनन ब्लेंड कपडा air-permeable म्हणून ओळखला जातो. म्हणजे या कपड्यातून हवा खूप खेळती राहते. कपडा अतिशय तलम असतो. शिवाय अंगाला आलेला घाम चटकन शोषून घेण्याची खूप क्षमता या कपड्यात असते. घामाचा स्टिकीनेस या कपड्यात जाणवतंही नाही. या कपड्याची गुणवत्ता अशी असते की त्यामुळे शरीरातील microcirculation flow अधिक चांगला होतो. अतिशय आरामदायी कपडा म्हणून कॉटन लिनन ब्लेंड कपडा ओळखला जातो. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलअनुष्का शर्माविराट कोहलीसेलिब्रिटीफॅशनसमर स्पेशल