Join us  

नाचतानाही आराध्याला पकडूनच ठेवत होती ऐश्वर्या, व्हिडिओ पाहून नेटिझन्स म्हणाले अगं आता तरी तिला.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2023 5:19 PM

Aishwarya Rai Gets Trolled: मुलगी आराध्याचा अजिबातच हात सोडत नाही... अगदी नाचतानाही तिला पकडूनच ठेवतेय, म्हणून सध्या ऐश्वर्या राय प्रचंड ट्रोल होत आहे. (Viral video of Aishwarya Rai and Aaradhya Bachchan)

ठळक मुद्देअगदी त्या दोघींचे कोणतेही फोटो पाहिले तरी ऐश्वर्याच्या हातात कायम आराध्याचा हात असतो. ती हात न धरता तिला कधी चालूही देत नाही.

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Aishwarya Rai and Abhishek Bachchan) यांची एकुलती एक लेक म्हणजे आराध्या (Aaradhya Bachchan).. त्यात ती बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी नात. त्यामुळे अगदी जन्माला आल्यापासूनच आराध्याभोवती प्रसिद्धीचं वलय आहे. तिच्या बाबतीतल्या अनेक चर्चा नेहमीच व्हायरल होत असतात. त्यामुळे सगळ्यात जास्त चर्चेत असलेल्या स्टार किड्समध्ये आराध्याचं नाव अग्रस्थानी असतं. आता पुन्हा एकदा आराध्या बच्चन चर्चेत आली आहे. पण यावेळी मात्र चर्चेचं कारण वेगळंच असून आई ऐश्वर्या तिला अजिबातच मोकळं सोडत नाही, कायम घट्ट धरून असते म्हणून नेटिझन्स ऐश्वर्याला बरंच काही काही ऐकवत आहेत.(Aishwarya Rai gets trolled because she is holding Aaradhya Bachchan while dancing)

 

ऐश्वर्याचा आणि आराध्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ काही महिने जुना आहे. पण तरी तो आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

फेशियल- स्क्रब किती दिवसांनी करावं? त्वचेची रोज कशी काळजी घ्यावी? बघा त्वचेसाठी खास स्किनकेअर कॅलेंडर

या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की कोणत्यातरी पार्टीमध्ये ऐश्वर्या आणि आराध्या या दोघी जणी डान्स करत आहेत. पण ऐश्वर्या आराध्याला सारखं पकडून ठेवते आहे. तिला मोकळेपणाने धड नाचूही देत नाहीये. हा व्हिडिओ पाहून नेटकरी ऐश्वर्याला बरंच काही ऐकवत आहेत. तिच्या बाबतीत ओव्हर प्रोटेक्टीव्ह होऊ नको, असा सल्लाही देत आहेत.

 

आईचं लेकीसाठीचं प्रेम आपण समजू शकतो. त्यानुसार ऐश्वर्या आराध्याची प्रत्येक वेळी काळजी घेताना दिसते.

त्वचेनुसार फाउंडेशनची योग्य शेड कशी निवडायची? बघा ५ सोप्या टिप्स- करा परफेक्ट निवड

अगदी त्या दोघींचे कोणतेही फोटो पाहिले तरी ऐश्वर्याच्या हातात कायम आराध्याचा हात असतो. ती हात न धरता आराध्याला कधी चालूही देत नाही. आता आई म्हणून तिची काळजी साहजिक असली तरी मुलांना थोडी स्पेस दिली पाहिजे. त्यांना त्याचं लहानपण एन्जॉय करू दिलं पाहिजे, असं काही नेटिझन्स म्हणत आहेत. तुम्हाला काय वाटतं?

 

टॅग्स :सोशल व्हायरलऐश्वर्या राय बच्चनव्हायरल फोटोज्