Join us  

औषधी गोळ्यांची रिकामी पाकिटं फेकून देता? पाहा २ खास उपयोग, ही ट्रिक एकदाच माहिती करुन घ्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2024 1:03 PM

2 Best Uses Of Medicine Wrapper: औषधी गोळ्यांची रिकामी पाकिटं इथून पुढे फेकून देऊ नका. बघा त्यांचा किती छान पद्धतीने पुनर्वापर करता येतो.... (best out of waste hacks)

ठळक मुद्देत्यांचे हे उपयोग जर पाहिले तर इथून पुढे ही पाकिटं तुम्ही कधीच टाकून देणार नाही.

आपल्या घरी नेहमीच कोणी ना कोणी आजारी पडल्याने औषधं- गोळ्या आणल्या जातात. ज्या घरात बीपी, शुगर असे पेशंट असतात, त्यांच्या घरी तर दर महिन्याला औषधांची खरेदी होतेच. ही औषधी गोळ्यांची पाकिटं घरातल्या काही छोट्या- मोठ्या कामांसाठी अतिशय उपयुक्त आहेत. आपल्याला त्याचा उपयोग माहिती नसल्याने आपण ते कचऱ्यात टाकून देतो. म्हणूनच आता औषधी गोळ्यांची रिकामी पाकिटं कोणत्या घरगुती कामांसाठी कशा पद्धतीने वापरायची ते पाहून घ्या (how to reuse medicine tablet cover?). त्यांचे हे उपयोग जर पाहिले तर इथून पुढे ही पाकिटं तुम्ही कधीच टाकून देणार नाही. (2 best uses of medicine wrapper)

औषधी गोळ्यांच्या रिकाम्या पाकिटांचे उपयोग

 

१. मिक्सरच्या भांड्याला धार लावण्यासाठी

बऱ्याचदा आपल्या घरच्या मिक्सरच्या भांड्याच्या ब्लेडची धार कमी झालेली असते. मिक्सरचं कोणत्याही आकाराचं भांडं असेल किंवा हॅण्ड मिक्सरच्या, ब्लेंडरच्या ब्लेडची धार कमी झाली असेल तर ते पुन्हा धारदार करण्यासाठी औषधी गोळ्यांच्या रिकाम्या पाकिटांचा खूप छान उपयोग होतो.

कुंडीमध्ये लावता येतील 'या' मसाल्यांची रोपं, करा प्रयोग- घेऊन पाहा घरच्या मसाल्यांचा स्वाद

यासाठी त्या पाकिटांचे तुकडे करा आणि मिक्सरच्या भांड्यात टाका. अर्ध्या मिनिटासाठी मिक्सर फिरवा. ब्लेड धारदार होईल. हॅण्डमिक्सरला धार लावण्यासाठीही अशीच ट्रिक वापरा.

 

२. दागिन्यांना चमकविण्यासाठी

तुमच्याकडचे ऑक्सिडाईज दागिने ठेवून ठेवून काळवंडले असतील तर त्यांना पुन्हा नव्यासारखं चमकविण्यासाठी औषधी गोळ्यांच्या रिकाम्या पाकिटांचा उपयोग करता येतो. यासाठी एका भांड्यात एकदम कडक पाणी घ्या.

नव्या झाडूने झाडताना खूपच भुसा बाहेर येतो? २ सोप्या ट्रिक्स, झाडू होईल स्वच्छ

त्या पाण्यात १ चमचा बेकिंग सोडा टाका. आता या पाण्यात तुमचे काळवंडलेले ऑक्सिडाईज दागिने भिजत ठेवा. चमच्याने ते दागिने खाली-वर हलवत राहा. पाणी कोमट झालं की दागिने काढून घ्या आणि एखाद्या कॉटनच्या स्वच्छ कपड्याने पुसा. दागिन्यांवर छान चमक येईल.  

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडीऔषधं