Join us  

दिवाळीत पैठणी घ्यायची म्हणता? पाहा पैठणीचे प्रकार आणि किंमत, अस्सल पैठणी ओळखायची लक्षात ठेवा युक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2023 6:25 PM

Types of Paithani Saree: दिवाळीसाठी भरजरी पैठणी खरेदी करण्याचा विचार असेल तर पैठणीचे हे काही प्रकार पाहून घ्या. सगळे प्रकार पाहूनच मग आवडीच्या पैठणीची खरेदी करा...

ठळक मुद्देबघा यापैकी पैठणीचे कोणते प्रकार तुम्हाला माहिती आहेत.

दिवाळसणाच्या निमित्ताने अनेक जणी पैठणी, बनारसी, कांजीवरम अशा साड्यांची खरेदी आवर्जून करतातच. त्यातही महाराष्ट्रीयन स्त्री असेल तर तिचं पैठणी प्रेम काही विचारायलाच नको. काही काही जणींकडे तर एकापेक्षा जास्त पैठणीही असतात. या दिवाळसणाला जर तुम्हालाही अस्सल पैठणी खरेदी करायची असेल तर दुकानात जाण्याआधी पैठणीचे प्रकार (Types of Paithani Saree) आणि तिच्या किमती पाहून घ्या (Rate of original paithani saree). पैठणीचे काठ कसे आहेत, त्यावरून तिचा प्रकार ठरतो. बघा यापैकी पैठणीचे कोणते प्रकार तुम्हाला माहिती आहेत. त्यापैकी एक प्रकार अतिशय लोकप्रिय असून तिच्या काठांवरची ती टिपिकल नक्षी पाहूनच ही पैठणी आहे हे लक्षात येतं. त्याव्यतिरिक्त पैठणीचे प्रकार पुढीलप्रमाणे...(How to identify original paithani)

पैठणीचे प्रकार

 

१. मोरबांगडी पैठणी (Morbangadi)

मोरबांगडी या प्रकारच्या पैठणीमध्ये पैठणीच्या काठांवर आणि पदरावर मोराचं डिझाईन विणलेलं असतं आणि त्या मोराच्या बाजुला एक गोलाकार असतो.

ब्लॅकहेड्समुळे नाक खूपच खरखरीत दिसते? ४ सोपे उपाय, नाकावरची त्वचा होईल स्वच्छ- मऊ

म्हणूनच त्याला मोरबांगडी पैठणी म्हणतात. या पैठणीमध्ये संपूर्ण साडीवर जो बुट्ट असतो, त्यावरही अगदी लहान आकाराची मोरबांगडी बुटी असते. 

२. मुनिया पैठणी (Munia)

 

हल्ली पैठणीचा हा प्रकारही बराच लोकप्रिय होत आहे. या प्रकारच्या पैठणीच्या काठांवर आणि पदरावर पोपटाचं डिझाईन असतं.

दिवाळीत घराला फेस्टिव्ह लूक देण्यासाठी वापरा जुन्या साड्या... बघा एकापेक्षा एक सुंदर आयडिया

तोता- मैना पैठणी म्हणूनही हा प्रकार ओळखला जातो. या पैठणीवरचा मोर बऱ्याचदा हिरव्या रंगाचा असतो. तसेच पोपटाचं डिझाईन उठून दिसण्यासाठी काठ प्लने सोनेरी रंगाचे असतात.

३. लोटस पैठणी (Lotus)

 

नावावरून लक्षात येतं की या पैठणीवर कमळाच्या फुलांचं डिझाईन असतं.

चेहरा तरुण-वय कमी-केस मात्र पांढरे? करा ॲक्युप्रेशर- योगमुद्रेचा सोपा उपाय, म्हातारपणापर्यंत केस राहतील काळेच

काठ आणि पदर या दोन्ही ठिकाणी हे डिझाईन विणलेलं असतं. ७ ते ८ रंगांमध्ये हे कमळ डिझाईन दिसून येतं. अस्सल पैठणीची ओळख ही तिच्यामध्ये असणारी चमक पाहूनच लक्षात येते. वरील कोणतीही पैठणी घेतली तरी ती कमीतकमी ५ हजार ते १ लाख किंवा त्यापेक्षाही जास्त किमतीपर्यंत मिळते. 

 

टॅग्स :दिवाळी 2023खरेदीसाडी नेसणे