Join us  

दसरा-दिवाळीला ट्रॅडीशनल कपड्यांवर घालण्यासाठी ज्वेलरी पाहताय? घ्या स्वस्तात मस्त पर्याय, खरेदी होईल सोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2023 10:08 AM

Online Jwellery Shopping for Festive season : वेगवेगळ्या प्रकारची हटके ज्वेलरीची खरेदी होईल सोपी...

दसरा-दिवाळी म्हटल्यावर आपण विविध गोष्टींची भरपूर खरेदी करतो. या काळात खरेदीवर भरपूर ऑफर्स असल्याने आपली ही खरेदी स्वस्तात मस्त होण्याचीही शक्यता असते. या काळात आपण पारंपरिक कपडे घालून एकमेकांच्या घरी, देवाला जात असल्याने त्यावर घालण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी लागते. नंतर लग्न किंवा इतर समारंभांसाठीही ही ज्वेलरी उपयोगी येते. हल्ली खरे दागिने घालण्यापेक्षा स्वस्तात मस्त अशी इमिटेशन, आर्टीफिशियल ज्वेलरी वापरण्याचा ट्रेंड वाढला आहे. ही ज्वेलरी आपल्याला अगदी स्वस्तात मस्त आमि हवी तशी मिळाली तर आणखी काय हवं. यासाठीच ज्वेलरीचे ऑनलाइन मिळणारे विविध पर्याय पाहूया (Online Jwellery Shopping for Festive season)...

१. थोड्या हटके पद्धतीची आणि मोती आणि खडे एकत्र असलेली अशी ज्वेलरी पाहत असाल तर हा पर्याय अतिशय उत्तम आहे. साडीवर गळ्याला जोडून असलेले हे चोकर आणि त्याखाली असलेली मोत्याची छान माळ अतिशय उठून दिसू शकेल. कुंदन प्रकारातील या खड्यामध्ये बिंदीही दिली असल्याने दसरा किंवा दिवाळीचा लूक पूर्ण करण्यासाठी ही फॅशनेबल ज्वेलरी तुम्ही नक्की ट्राय करु शकता. 

Click To Buy : 

https://amzn.to/46T80c4

स्वस्तात मस्त अशी स्टोनचा ज्वेलरी सेट पाहत असाल तर अशाप्रकारचे दुरुनही उठून दिसणारे थोडे मोठ्या आकाराचे सेट तुम्ही नक्की घेऊ शकता. याची किंमतही अगदी ५०० रुपयांच्या आत असल्याने एकदा घेतले की पुढची काही वर्ष आपण ही ज्वेलरी नक्की वापरु शकतो. गळ्यातले आणि कानातले आकाराने मोठे असल्याने त्यावर इतर काही ज्वेलरी घातली नाही तरी चालेल.

Click To Buy : 

https://bit.ly/45CGBKl

पारंपरीक गोल्डन प्रकारातील ज्वेलरी पाहत असाल तर मिंत्रा या साईटवर गोल्ड प्लेटेड ज्वेलरी अगदीच ३०० रुपयांच्या रेंजमध्ये मिळू शकेल. हा सेट पूर्ण गळाभर असल्याने सणावाराला पारंपरीक कपड्यांवर तो अतिशय छान दिसतो. 

Click To Buy : 

https://bit.ly/46KyhJG

वेस्टर्न पद्धतीची सुखी ब्रँडची ही ज्वेलरी पंजाबी सूट, घागरा, साडी अशा कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर अतिशय सुंदर दिसेल. अतिशय वेगळी आणि नाजूक डीझाईन असलेली ही ज्वेलरी अवघ्या ३०० रुपयांना मिळत असल्याने हे डील फारच स्वस्तात मस्त आहे यात वाद नाही. 

Click To Buy : 

https://bit.ly/3QlouEr

टॅग्स :खरेदीदागिनेफॅशन