Join us  

फाउंडेशन तर घ्यायचंय पण आपल्या त्वचेसाठी परफेक्ट शेड कशी निवडणार? ३ गोष्टी लक्षात ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 4:30 PM

Shopping tips: फाउंडेशनची शेड परफेक्ट निवडली गेली तर तुमचा मेकअप अधिक खुलतो, यात वादच नाही.... म्हणूनच तर फाउंडेशनची शेड आपल्या स्किनटोननुसार (skin tone) नेहमीच परफेक्ट निवडता आली पाहिजे.

ठळक मुद्देतुमच्या स्किनचा अंडरटोन कसा आहे, यावरून तुमच्या फाउंडेशनचा शेड ठरतो.

मेकअप बेस म्हणून फाउंडेशन ओळखले जाते. त्यामुळे कोणत्याही पार्टीसाठी किंवा समारंभासाठी तयार होताना फाउंडेशनचा (How to select foundation shade perfectly) उपयोग केलाच जातो. आता तर प्रत्येक जणच आपल्या दिसण्याबाबत, स्वत:ला प्रेझेंट करण्याबाबत खूप जागरूक झालेला आहे. त्यामुळे हल्ली बऱ्याच वर्किंग वुमन त्यांच्या डेली मेकअपचा भाग म्हणूनही फाउंडेशन वापरतातच.

 

आधी सांगितल्याप्रमाणेच फाउंडेशन हा मेकअपचा बेस आहे. त्यामुळे तुम्ही ते कशा पद्धतीने लावता हे खूप जास्त महत्त्वाचं ठरतं. कारण त्यावरच तुमचा मेकअप कसा होणार किंवा दिसणार हे अवलंबून असतं. आपल्या सभोवती आपण अनेक जणी पाहतो. ज्यांचा मेकअपनंतरचा चेहरा खूपच डल दिसतो. म्हणजे त्या मेकअप करण्यापुर्वी चांगल्या गोऱ्या वाटत होत्या, असं त्यांचा मेकअप पाहून जाणवतं. किंवा कधी कधी असंही होतं की फाउंडेशन लावल्यानंतर अक्षरश: चेहऱ्यावर मेकअपचे थर लावलेले आहेत की काय, असं वाटू लागतं... 

 

हे सगळे परिणाम आहेत फाउंडेशनची शेड चुकल्याचे. म्हणूनच असं काही आपल्या मेकअपबाबत होऊ  नये, असं वाटत असेल तर फाउंडेशन खरेदी करताना या ३ गोष्टी तपासा आणि मगच फाउंडेशन खरेदी करा. फाउंडेशनची शेड अचूक पद्धतीने कशी निवडायची, याविषयीचा व्हिडिओ Saloni aneja यांनी त्यांच्या  इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला असून हा व्हिडिओ खूपच उपयुक्त ठरत असल्याची कमेंट त्यांना अनेक जणींकडून आली आहे. 

 

फाउंडेशन खरेदी करण्यापुर्वी या गोष्टी तपासून घ्या..१. स्किन अंडरटोन (skin undertone)तुमच्या स्किनचा अंडरटोन कसा आहे, यावरून तुमच्या फाउंडेशनचा शेड ठरतो. कुल, वार्म आणि न्यूट्रल हे तीन आपल्या स्किनच्या अंडरटोनचे प्रकार असतात. आपल्या स्किनचा अंडरटोन कसा आहे हे ओळखायचं असेल तर ही एक सोपी टेस्ट करून बघा. उन्हात उभे रहा. तुमच्या मनगटांवरील नस कोणत्या रंगाची दिसते ते बघा. जर तुमची नस निळी- बैंगनी रंगाची दिसत असेल तर तुम्ही कुल अंडरटोनचे आहात. जर नस ग्रे रंगाची दिसत असेल तर तुमचा अंडर टोन वार्म आहे. तसेच जर हाताची नस निळा आणि ग्रे यामधल्या रंगाची असेल तर तुमचा स्किनटोन न्युट्रल आहे हे ओळखावे.अंडरटोन नुसार असं निवडा फाउंडेशनवार्म अंडरटोन- यलो बेस फाउंडेशनकुल अंडरटोन- पिंक बेस फाउंडेशनन्यूट्रल अंडरटोन- पिंक ॲण्ड यलो मिक्स कॉम्बिनेशन

 

२. स्किन टाईप (skin type)ऑईली स्किन टाईप असेल तर मॅट फाउंडेशन वापरा. जर तुमची स्किन कोरडी असेल तर हायड्रेटिंग फाउंडेशन घ्या. जर तुमचा स्किन टाईप नॉर्मल असेल तर तुम्ही कोणतंही फाउंडेशन घेऊ शकता. जर तुमची स्किन कॉम्बिनेशन प्रकारातली असेल तर तुम्ही नॉर्मल टु हायड्रेटिंग या प्रकारातलं फाउंडेशन घेऊ शकता. 

 

३. स्किन टोन (skin tone)तुमचा जो काही स्किन टोन म्हणजेच त्वचेचा रंग असेल त्यापेक्षा दोन किंवा तीन टोन लाईटर असणारं फाउंडेशन निवडा. फाउंडेशन हे नेहमी हातावर लावून तपासलं जातं. तसं करू नका. फाउंडेशन तुमच्या जॉ लाईनवर लावा आणि मगच योग्य शेड निवडून फाउंडेशन खरेदी करा. 

 

टॅग्स :खरेदीमेकअप टिप्सब्यूटी टिप्स