Join us  

कसा निवडाल बेस्ट, ट्रेण्डी आणि सुंदर लखनवी कुर्ता? बेस्ट चिकनकारी कुर्ता घ्यायचाय, त्यासाठी शॉपिंगमंत्र..

By ऐश्वर्या पेवाल | Published: November 18, 2021 5:20 PM

लखनवी कुर्ता निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? सध्या लखनवी कुर्त्यांचा ट्रेण्ड इन आहे, तर कधी करताय खरेदी?

ठळक मुद्देसुंदर कलरचा लखनवी कुर्ता आणि त्यावर चिकनकारी प्लाझो सोबतच एका हातात वॉच आणि ऑक्सिडाइज्ड कानातले असा सुंदर लूक तुम्ही करू शकता.

ऐश्वर्या पेवाल

लखनवी कुर्ता म्हंटलं तर डोळ्यांसमोर येतात  सुंदर, मऊ, आणि चिकनकारी वर्क केलेले कपडे. अलीकडे लखनवी कुर्त्यांची क्रेझ वाढली आहे पुन्हा. प्रत्येक मुलीला, स्त्रीला त्यांच्याकडे एक तरी लखनवी कुर्ता असावा असंच वाटतं. त्यात व्हरायटीही भरपूर आणि कोणत्याही कलरच्या लखनवी कुर्त्यासोबत व्हाईट पॅन्ट्स आणि प्लेन दुपट्टा घेऊनसुद्धा छान स्टायलिंग करता येते. आता फक्त लखनवी कुर्ताच नाही तर लखनवी चिकनकारी पलाझो,पॅण्ट्सही मार्केटमध्ये सहज मिळतात. मात्र लखनवी कुर्ता घेताना नेमका काय विचार करायचा, कसं स्टायलिंग करायचं, काय मिक्स मॅच छान दिसतं असे अनेक प्रश्न असतात. तर त्याविषयीच आज बोलूया..

लखनवी कुर्ता महाग असतात का? असा प्रश्न अनेकींना पडतो. तर त्याचं उत्तर हे की तुम्ही कुठून आणि कसे खरेदी करताय त्यावर अवलंबून असतं. साधारण २५० रुपयांपासून ते २ हजार रुपयांपर्यंत लखनवी कुर्ते मिळतात. यात फक्त कुर्ता नाही तर त्याच्या आत मध्ये त्याचं अस्तर म्हणजेच स्लिप त्यासोबत कॉम्प्लिमेंटरी मिळते. जर कुर्ता हेवी असेल म्हणजेच जाड असेल तर त्यात तुम्हाला स्लिप मिळत नाही. २५० रुपयांपासून कॉटनचे रेग्युलर साईजच्या लखनवी कुर्त्यांची सुरुवात होते. रेशम दोऱ्याचे हॅन्डवर्क असलेले लखनवी कुर्ते साधारण ४००-६०० रुपयांपासून मिळतात. लखनवी कुर्त्यांमध्ये साधे आणि रेग्युलर कुर्तेच नाही तर पार्टीसाठीसुद्धा तुम्ही लखनवी कुर्ते खरेदी करू शकता. हो! पार्टीसाठी, सणासुदीला, फिरण्यासाठी, इतकंच काय तर कोणाच्याही लग्नाला जाताना सुद्धा तुम्ही तुमचा हटके लूक करू शकता.सुंदर कलरचा लखनवी कुर्ता आणि त्यावर चिकनकारी प्लाझो सोबतच एका हातात वॉच आणि ऑक्सिडाइज्ड कानातले असा सुंदर लूक तुम्ही करू शकता. जर तुम्ही गोल नेकचा पार्टीसाठीचा लखनवी कुर्ता घालत असाल तर ऑक्सिडाइज्ड सेट (oxidised jewellery) घालून तुम्ही सिम्पल पण आकर्षक असा लूक करू शकता.

खरेदी करताना काय माहिती हवं?

जर तुम्हाला लॉंग, फुल्ल स्लिव्ह्जचे अनारकली कुर्ते आवडत असतील तर लखनवी कुर्त्यांमध्ये भरीव काम केलेले रेशम थ्रेड वर्क असलेले कुर्ते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. थ्री लेयर गाऊन पॅटर्न लखनवी कुर्ते अलीकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.लखनवी कुर्त्यामध्ये २ प्रकारचे वर्क जास्त ट्रेंड करतात. एक म्हणजे हॅन्डवर्क, हाताने काम केलेले आणि एक म्हणजे मशीन वर्क, मशीनने काम केलेले. मशीन वर्क लखनवी कुर्ते हे हॅन्डवर्क कुर्त्यांपेक्षा स्वस्त असतात.पूर्ण लखनवी कुर्ता सेट घ्यायचा विचार करत असाल तर तुम्हाला ७०० ते १५०० रुपये इतके मोजावे लागतात. या सेट मध्ये तुम्हाला एक लखनवी कुर्ता, लखनवी वर्क पलाझो आणि दुपट्टा मिळतो. गरारा सेट हा सुद्धा लखनवी कुर्ता सेट पैकी एक आहे.लखनवी कुर्त्यांमध्ये अजून एक आकर्षक गोष्ट म्हणजे आता हे कुर्ते आणि सेट लहान मुलींसाठी सुद्धा मार्केट मध्ये मिळतात. म्हणजे आता कोणत्याही चिमुकलीला जर काही गिफ्ट द्याच असेल तर नक्कीच हे सेट तुम्ही घेऊ शकता.

लखनवी कुर्ता घालण्याचे फायदे खूप..

१. हे कुर्ते हलके असतात आणि कॉटन असल्याने जास्त काळ टिकतात.२. खूप सारी व्हरायटी मिळते.३. बजेट फ्रेंडली असतात.४. ऑनलाईन किंवा दुकानात सहज मिळतात.५. ट्रेंडी लूकसाठी उत्तम पर्याय.

आणि शॉपिंग करण्यापूर्वी पाहा हा खास व्हीडिओ

तर असे लखनवी कुर्ते तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट मध्ये तुम्हाला लखनवी कुर्ते का आवडतात ते सांगा..

टॅग्स :खरेदीमहिला