Join us  

आईसाठी एकदम स्पेशल गिफ्ट घ्यायचंय? ४ आयडिया, एक हजार रुपयांच्या आत खास भेट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2023 8:17 PM

4 Best Mother’s Day Gift Ideas in Under Rupees 1000 : Mother's Day Special : आईसाठी काय गिफ्ट घ्यायचं, आईला काय आवडतं याचा विचार केलाय कधी? त्यासाठीच या काही आयडिया

आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आईच वेगळं असं एक खास स्थान आहे. दिवसाची सुरुवात झाल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टींसाठी आई हवी असते. सुखाचा प्रसंग असो किंवा दुःखाचा सगळ्या गोष्टीत आपल्याला आई सोबत हवी असते. आईच महत्व सांगण्यासाठी, आईविषयीचे प्रेम आणि आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी मे महिन्यामध्ये 'मदर्स डे' साजरा केला जातो. खरंतर प्रत्येक दिवस हा 'मदर्स डे' च असतो, कारण आईशिवाय आपल्या कोणाचेच पान हलत नाही. 

'आई' हा असा शब्द आहे, ज्यामध्ये भावना आणि प्रेम दोन्ही गोष्टी सामावलेल्या आहेत. आईचं महत्त्व कधीच कमी होऊ शकत नाही आणि तिची जागा आपल्या आयुष्यात कोणी घेऊ शकत नाही. आईच्या प्रेमाचं आणि ममतेचं मोल आपण आयुष्यभर फेडू शकत नाही. मग तिच्यावरील प्रेम जाहीर करण्याचा एक उत्तम दिवस म्हणजे 'मदर्स डे.' आईला मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा देण्यासोबतच तिच्यासाठी भरपूर काही करण्याची आपली इच्छा असते. कारण हा दिवस फक्त तिच्यासाठीच नाहीतर आपल्यासाठीही खास असतो. आईला मदर्स डे ला नेमकं काय गिफ्ट द्यावं हा प्रश्न पडत असेल तर काही पर्याय पाहूयात(Heartfelt And Unique Mother's Day Gift Ideas Under ₹1000).

आईला मदर्स डे ला नेमकं काय गिफ्ट द्यावं ? 

१. हॅन्ड बॅग / पर्स :- तुम्हाला तुमच्या आईला एखादं मोठं गिफ्ट द्यायचं असेल पण काय द्यायचं हे सुचत नसेल, तर ही ब्रँड बॅग तिचा दिवस अतिशय खास करू शकते. ही एक अतिशय सुंदर दिसणारी अशी हॅन्ड बॅग आहे. ज्याला लोकांनी खूप चांगले रेटिंग दिले आहे. ही पर्स बॅग अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहे. ही एक प्रशस्त मोठी हॅन्ड बॅग आहे जी तुमच्या आईला नक्कीच आवडेल. त्यामुळे तुम्ही आजच ही बॅग ऑर्डर करू शकता आणि मदर्स डे च्या खास प्रसंगी तुमच्या आईला गिफ्ट करू शकता, या सुंदरशा बॅगेची किंमत ९५९ रुपये इतकी आहे.  लावी महिला बॅग किंमत: रु.959.  

२. Indigifts रोमँटिक कुशन आणि कॉफी मग :- आई हा शब्द स्वतःच खूप खास आहे. आई आपल्या मुलांसाठी काय करत नाही. मग तिला या मदर्स डे ला खास वाटायला नको का? यासाठी आईला देण्यासाठी बाजारांत अनेक पर्याय उपलब्ध आहेत ज्यामुळे आपण आईसाठी एक उत्तम गिफ्ट खरेदी करु शकता. हा कॉम्बो पॅक तुमच्या आईचे मन जिंकेल याची खात्री आहे. यामध्ये तुम्हाला डिअर मॉम लिहिलेली गोंडस कुशन मिळणार आहे त्यासोबतच आईच्या बाबतीतला सुंदर छोटा मजकूर लिहिलेला कॉफी मग देखील मिळेल. तुम्ही १००० रुपयांच्या आत मदर्स डे गिफ्ट खरेदी करू शकता हे खूप सुंदर पर्याय असू शकतो. यामध्ये तुम्हाला एक दोन नाही तर अनेक रंग मिळतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या आईच्या आवडत्या रंगानुसार कुशन आणि कॉफी मग निवडू शकता. Indigifts रोमँटिक कुशन आणि मग किंमत: Rs.549.  

३. हार्ट शेप नेकलेस :- आई आणि मुलांचे नाते अमूल्य असते. या बंधाचे शब्दात वर्णन करता येत नाही. मदर्स डे निमित्त तुम्ही तुमच्या आईला काही खास देण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक अप्रतिम पर्याय आहे. हा हार्ट शेप नाजूकसा नेकलेस तुम्ही आईला गिफ्ट म्हणून देऊ शकता. ज्यामध्ये आई आणि मुलाचा चेहरा बनवला आहे. हा इतका सुंदर नेकलेस आहे की प्रत्येकजण त्याच्याकडे पाहत राहतील. हा नेकलेस तुम्हाला ४१९ रुपयांपर्यंत मिळू शकेल. विरासी हार्ट शेप लटकन किंमत: 419 रुपये. 

४.  सिल्क ब्लेंड साडी :- साडी हा महिलांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. मदर्स डे च्या दिवशी जर तुम्ही आईला छान साडी गिफ्ट म्हणून दिली तर तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू नक्कीच येईल. अशा परिस्थितीत, मदर्स डे च्या दिवशी, तुम्ही तुमच्या आईला एक सुंदर साडी भेट म्हणून देऊ शकता. ही सिल्क साडी गुलाबी रंगात उपलब्ध आहे. ही साडी ब्लाऊजपीसच्या कापडासह तुम्हांला घरपोच मिळेल. त्याचे फॅब्रिकही चांगले आहे. आईला भेटवस्तूं देण्यायोग्य आहे. ही साडी तुम्हांला ७२९ इतक्या किंमतीत मिळेल. लीझा स्टोअर वुमेन्स सिल्क ब्लेंड साडीची किंमत : रु.729. 

टॅग्स :खरेदीमदर्स डे