Join us  

चिंचपेटी, तन्मणी, मोत्याचे झुबे घ्यायचेत? ठसठशीत मोत्यांच्या दागिन्यांची खरेदी आता करा अगदी बजेटमध्ये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2023 4:10 PM

Pearl Jewellery Shopping For Diwali: दिवाळसणानिमित्त मोत्याच्या दागिन्यांची खरेदी करायची असेल, तर हे काही सुंदर पर्याय एकदा पाहून घ्या...

ठळक मुद्देअगदी ५०० रुपयांतही खूप सुंदर दागिने मिळू शकतात.

मोत्याच्या दागिन्यांचं सौंदर्य अगदी वेगळंच असतं. काठपदर साडीवर जसे ते छान दिसतात तसेच ते डिझायनर साडीवरही शोभून दिसतात. त्यामुळे मोत्यांचे दागिने आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवेत. दिवाळसणानिमित्त अनेक जणी आवर्जून मोत्याच्या दागिन्यांची खरेदी करतात. त्यात चिंचपेटी, तन्मणी (Chinchapeti, Tanmani Necklace shopping for diwali) हे पारंपरिक दागिने घेण्यास जास्त भर दिला जातो. आता दिवाळीनिमित्त तुम्हाला जर अशाच काही मोत्यांच्या पारंपरिक दागिन्यांची खरेदी (Pearl Jewellery shopping) करायची असेल तर हे काही पर्याय एकदा बघा.. अगदी ५०० रुपयांतही खूप सुंदर दागिने मिळू शकतात. (Moti necklace shopping) 

मोत्याच्या दागिन्यांची खरेदी

१. चिंचपेटी

 

हा एक अतिशय सुंदर दागिना आहे. हा एकच दागिना गळ्यात घातला तरी तुम्ही चारचौघीत उठून दिसाल.

बाल्कनीत लावलेल्या टोमॅटोच्या रोपलाही येऊ शकतात भरपूर टोमॅटो, बघा कुंडीमध्ये कसं लावायचं रोप....

लहान मुलींना जशी चिंचपेटी छान दिसते, तशीच अगदी वयस्कर आजीबाईंनाही शोभून दिसते. चिंचपेटीचे अनेक पर्याय ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध असून अगदी २५० रुपयांपासून ते सुरू होतात. काही गुलाबी रंगात आहेत, काही हिरव्या रंगात आहेत तर काही मल्टीकलर प्रकारात आहेत. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0CKW3MPDL

२. तन्मणी

 

गळ्याच्या अगदी लगत चिंचपेटी आणि त्याखाली तन्मणी असे दागिने घातले तर गळा अगदी भरून दिसतो.

"टायगर ३ साठी फिटनेस कमावणं म्हणजे स्वत:च्या लिमिट्स.....", कतरिना कैफ सांगितेय तिचा खडतर अनुभव

तन्मणी हा दागिना देखील तुम्ही साडी, नऊवारी, सलवार- कुर्ता अशा कोणत्याही पेहरावावर घालू शकता. त्यामुळे हा दागिना आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवा. ऑनलाईन शॉपिंग साईटवर ४००- ५०० रुपयांमध्ये तन्मणी मिळतो.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0CC2NGMZ4

३. मोत्यांचा सेट

 

चिंचपेटी, तन्मणी, नथ, कानातले आणि बांगड्या असा सगळा मोत्यांचा सेट ४९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग सेटवर मिळत आहे. हा एकच सेट घेतला तरी तो पुरेसा ठरतो. 

मुलांच्या मदतीने घरीच करा सुंदर आकाशकंदिल, इतका सोपा की मुलंही करतील आनंदाने, पाहा कसा करायचा?

शिवाय कमी किमतीत अख्खा सेट मिळतो आहे, त्यामुळे दिवाळसणाला अशी बजेटमधली शॉपिंग लवकर करून टाका. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0CDX5KSRZ 

टॅग्स :दिवाळी 2023खरेदीदागिने