Join us  

बायकांना नोकरी का सोडून द्यावी लागते? इच्छा असूनही घराबाहेर पडून काम करता येत नाही कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2024 5:19 PM

नोकरी सोडून घरी बसण्याचा निर्णय बायका का घेतात? की परिस्थिती तसा निर्णय घ्यायला भाग पाडते?

-अनन्या भारद्वाज, मुक्त पत्रकार

दिल धडकने दो सिनेमातला एक संवाद आहे. त्यात आयेशा मेहरा या नायिकेचा नवरा असलेला मानव म्हणतो, आजवर आमच्या घराण्यात कुणी बाहेर जाऊन काम केलं नाही; पण मी आयेशाला बिझनेस सांभाळण्याची परवानगी दिली!तो म्हणतो ते बोचरं असलं तरी आजही अनेक महिला घरून नोकरी करण्याची परवानगी असेल तरच नोकरी करू शकतात. अगदी लग्न ठरलेल्या आधुनिक मुलीही सहज सांगतात की ‘त्यांनी’ म्हणजे सासरच्यांनी सांगितलं आहे की तू नोकरी केलीस तरी आमची काही हरकत नाही. म्हणजेच आजही तरुणीने / बाईने नोकरी करणं हे घरच्यांच्या इच्छेवर आणि परवानगीवरच बहुतांश अवलंबून असतं. तशी परवानगी नसेल तर अनेकजणी नोकरी साेडून, विशेषत: मूल झाल्यानंतर तर घरीच बसतात.

(Image : google) 

एनपीआर.ओर.जी. या साइटवरच्या लेखाचा संदर्भ घेत सांगायचं तर भारतीय अर्थव्यवस्था जोमाने वाढत असताना दुसरीकडे महिलांचं घराबाहेर पडून काम करणं कमी होतं आहे. २०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमाकांची बलाढ्य अर्थव्यवस्था होईल असा अंदाज आहे.ज्या अर्थव्यवस्थेत महिला अधिक प्रमाणात नोकऱ्या, व्यवसाय करतात त्या अर्थव्यवस्थेची वाढ वेगानं होते असं दिसतं. १९९० ते २००० याकाळात भारतीय अर्थव्यवस्थेतही महिलांचे नोकऱ्यांचे प्रमाण वाढलेले होते. अर्थात म्हणजे तरीही दर ५ पैकी फक्त एक महिला अधिकृत नोकरी म्हणावी असं काम करते. घरकाम, शेतीतली कामं त्यात मोजली जात नाही.

(Image : google)पाच शक्यता म्हणून नोकरी नको !

१. घरात संपन्नता आली, समृद्धी असेल, आर्थिक स्थिती उत्तम असेल तर त्या घरातल्या बाईला नोकरी करण्याची काहीच गरज नाही असं मानलं जातं त्यामुळे संपन्न घरातल्या स्त्रियांचे नोकरी करण्याचे प्रमाण कमी होताना दिसते.२. महिला उच्चशिक्षण घेत आहेत आणि उच्च शिक्षण घेत असताना दुसरीकडे नोकरी करणं शक्य नसतं त्यामुळेही नोकरीयोग्य वयातल्या मुली श्रमिक वर्गाबाहेर राहतात.

३. नव्या नोकऱ्यांसाठी अनेकदा स्थलांतराची गरज भासते. आपलं घर, शहर सोडून दुसऱ्या शहरात जायची एकतर महिलांची तयारी नसते, राहण्याचे सुरक्षिततेचे प्रश्न असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरची परवानगी नसते.४. बायकांना १० ते ५ करता येतील अशा नोकऱ्यांचं प्रमाणही आता कमी होतं आहे. तासन्तास काम करण्याच्या नोकऱ्या, उशिरापर्यंतचं काम आणि घरची जबाबदारी यामुळेही अनेकींना नोकरी करणं जमत नाही. कामाचे वाढते ताण आणि तास आणि घरासह मुलांची जबाबदारी यामुळेही नोकरी सोडावी लागते. 

टॅग्स :महिलानोकरीअर्थव्यवस्था