आइस्क्रीम आणि पौष्टिक.... काहीतरीच काय? असं वाटत असेल तर आइस्क्रीममधील गुण वाचून तर पाहा!
Updated:March 20, 2021 19:06 IST2021-03-20T18:58:00+5:302021-03-20T19:06:06+5:30
आइस्क्रीम हे फक्त मजेसाठी म्हणून खायचं असं नाही. तर आइस्क्रीममधेही पोषणमूल्यं असतात. ती कोणती?

उन्हाळा सरु झाला की सारखं आइस्क्रीम खावंसं वाटतं. पण आरोग्याविषयी सजग असलेली माणसं आइस्क्रीम म्हटलं की नाक मुरडतात. सारखं आइस्क्रीम खाऊन कसं चालेल? तसंही आइस्क्रीममधून थंडाव्याशिवाय दुसरं मिळतं तरी काय ? आइस्क्रीममधे काय पोषण मूल्यं असतात? असे प्रश्न विचारतात. पण हे प्रश्न निरुत्तर करणारी वाटत असली तरी अशा प्रश्नांना उत्तरं देता येतील. कारण आइस्क्रीम खाण्याचे काही फायदेही आहेत.
आइस्क्रीममधे ड आणि अ जीवनसत्त्व यासोबतच कॅल्शिअम, फॉस्फरस ही खनिजं असतात. शिवाय आपण ज्या फ्लेवरचं आइस्क्रीम खातो तसे आणखी पोषणमूल्यं आपल्याला आइस्क्रीममधून मिळतात. जसे डार्क चॉकलेट या फ्लेवरच्या आइस्क्रीममधे अॅण्टिऑक्सिडण्टस आणि फ्लेवोनॉइडस असतात. जे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात.
आइस्क्रीम खाल्ल्यानंतर शरीरास त्वरित ऊर्जा मिळते. आइस्क्रीममधील साखरेमुळे तरतरी येते. थकवा आला असेल तर तो निघून जातो. आइस्क्रीम खाऊन मेंदूला उत्तेजन मिळतं. -
आइस्क्रीम आपला मूड छान करतो. यामागचं कारण म्हणजे आइस्क्रीममुळे आनंदी करणारं सेरेटोनिन हे हार्मोन स्त्रवतं. त्यामळे आइस्क्रीम खाल्ल्यानंतर छान वाटायला लागतं. त्यामळे जेव्हा खूप उदास वाटत असेल तर आपल्या आवडीचं आइस्क्रीम खाऊन यावं.
आइस्क्रीम हे असं गुणाचं असलं तरी आइस्क्रीम खाण्याचेही काही नियम आहेत. आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा आइस्क्रीम खाणं योग्य असं डॉक्टर सांगतात.