लग्नसमारंभात उठून दिसतात कुंदन बांगड्या घातलेले हात, पाहा ५ लेटेस्ट- सुंदर कुंदन चुडी सेट
Updated:November 12, 2025 17:12 IST2025-11-12T17:06:33+5:302025-11-12T17:12:18+5:30
kundan bangles design: latest kundan chudi sets: bridal kundan bangles: पाहा कुंदन बांगड्यांचे खास सुंदर डिझाइन्स

लग्नसराई किंवा कोणताही महत्त्वाचा कार्यक्रम असला की महिलांना सगळ्यात जास्त आवडतात ते दागिने. अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत त्यांच्याकडे दागिने पाहायला मिळतात. पण महिलांचा साजश्रृंगार हा बांगड्यांशिवाय अपूर्णच. पूर्वी फक्त काचेच्या बांगड्या मिळायच्या. पण हल्ली बांगड्यांमध्ये देखील विविध प्रकार पाहायला मिळतात. (kundan bangles design)
भरजरी साडी, दागिन्यांवर हाताला शोभतील अशा बांगड्या आपण कायमच शोधत असतो. पण सध्या बाजारात विविध आणि लेटस्ट पद्धतीच्या बांगड्या आल्या आहेत. जर आपण गळ्यात जड दागिने घालत असू तर हाताला शोभतील अशा बांगड्या घालायला हव्या. पाहा कुंदन बांगड्यांचे खास सुंदर डिझाइन्स. (latest kundan chudi sets)
लग्न समारंभात आपण मोत्याचे आणि स्टोनच्या बांगड्यांचे कॉम्बिनेशन ट्राय करु शकतो. यामुळे आपला लूक कायम उठून दिसेल.
क्लासिक डिझाइन्समध्ये गोल्डन किंवा मरुन किंवा लाल रंगाच्या बांगड्या कायम उठून दिसतात. हे रंग एकमेकांमध्ये जोडले गेल्यानंतर हाताची शोभा वाढते.
सध्या कॉन्ट्रास्ट रंगाचे दागिने खूप ट्रेंडमध्ये आहे. त्यात पेस्टल रंग, हिरवा किंवा निळा रंग उठून दिसतो. यात गुलाबी रंगाचे मिश्रण छान दिसते.
जर आपल्याला बोल्डनेस हवा असेल तर गोल्डन, निळा किंवा हिरव्या रंगाचे कॉम्बिनेशन ट्राय करु शकता. यामध्ये लक्ष्मी, डायमंड आणि विविध कोरीव काम केलेले असते.
कुंदन बांगड्यांमध्ये आपण कलरफुल मीनाकारी बांगड्यांवर स्टोन वर्क पाहायला मिळते. यात डायमंड, मोती असतात. जे विविध रंगानी मडवलेले आहेत.