मोत्याचे तोडे-बांगड्यांच्या ७ सुंदर डिझाइन्स-लग्नात भरजरी साडीवर दिसतील शोभून-परंपरा आणि नवेपणाचा दागिना
Updated:November 3, 2025 17:29 IST2025-11-03T16:16:33+5:302025-11-03T17:29:34+5:30
Pearl bangles designs: Bridal pearl bangles: Latest pearl jewelry: मोत्याच्या बांगड्या म्हणजे सौंदर्य, सोज्वळपणा आणि क्लास यांचा मिलाफ पाहूयात नवीन डिझाईन्स.

लग्नसमारंभ म्हटलं की साडी, ड्रेस, दागिने आणि साजश्रृंगार ह्याला वेगळंच स्थान असतं. आजकाल नवरी असो की मैत्रीण किंवा एखाद्या जवळच्या नातेवाईकांच लग्न. आपला लूक सगळ्यांमध्ये उठून दिसावा असं प्रत्येकाला वाटतं.(Pearl bangles designs)
भरजरी साडी, दागिने आणि त्यात हातात मोत्याच्या बांगड्या असतील तर लूक एकदम रॉयल दिसेल. मोत्याच्या बांगड्या म्हणजे सौंदर्य, सोज्वळपणा आणि क्लास यांचा मिलाफ. पाहूयात नवीन डिझाईन्स.(Bridal pearl bangles)
आपण जर हळदीत किंवा लग्नात हिरव्या बांगड्या घालणार असू तर त्यात मोत्याच्या बांगड्यांचा सेट घालू शकता. यात आपण विविध रंगाच्या बांगड्या देखील घालू शकतात.
लग्नात नऊवारी साडी नेसणार असाल तर हातात बांगड्यांसोबत तोडे देखील घालू शकतात. यामध्ये डायमंड, मोतीचे विविध पॅटर्न आहेत.
सध्या बाजारात डायमंड आणि मोत्याचे छान बांगड्यांचे पॅटर्न पाहायला मिळतात. सध्या झुमका बँग्लस खूप ट्रेंडमध्ये आहे.
गजरा बांगड्या किंवा गजरा फुलांच्या माळांसारख्या असणाऱ्या या मोतीच्या बांगड्या आपल्या साजश्रृंगारात भर घालतात.
झुमका स्टाइल बांगड्यांमध्ये आपण मोती आणि डायमंडच्या बांगड्या घालू शकतो. याला पंजाबी पाकिस्तानी बांगड्या सेट असं म्हटलं जातं.
सिल्व्हर पर्ल बांगडी सेटमध्ये चार सिंपल डिझाईन्सच्या बांगड्या आपल्याला मिळतील. ज्यावर चांदीचा वर्ख केलेला असेल. पारंपरिक लूकवर या बांगड्या छान दिसतील.