विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?

Updated:December 1, 2025 16:10 IST2025-12-01T15:58:50+5:302025-12-01T16:10:17+5:30

Virat Kohli And Virat Kohli : दोन क्रिकेटर्सच्या खाण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीवरून क्रिकेट चाहत्यांमध्ये आणि फिटनेसप्रेमींमध्ये तुफान चर्चा रंगली आहे

विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये विराट प्रोटीन बार खाताना दिसतो, तर रोहित शर्मा डाळ-भात खाताना दिसतो.

विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?

दोन क्रिकेटर्सच्या खाण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीवरून क्रिकेट चाहत्यांमध्ये आणि फिटनेसप्रेमींमध्ये तुफान चर्चा रंगली आहे. बिझी शेड्यूलमध्ये फिटनेस आणि एनर्जी लेव्हलसाठी खेळाडूंचा आहार कसा असावा यावर चर्चा सुरू झाली आहे.

विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?

विराट कोहली हा त्याच्या फिटनेससाठी जगभरात ओळखला जातो. डाएटबाबत तो अत्यंत कठोर नियम पाळतो. एनर्जीसाठी तो प्रोटीन बार खाणं पसंत करतो. विराटसारख्या खेळाडूंना 'झटपट एनर्जी' आणि पोर्टेबिलिटी यामुळे प्रोटीन बारची निवड सोयीस्कर वाटते.

विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?

प्रोटीन बारमध्ये हाय क्वालिटी प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि आवश्यक फॅट्सचं योग्य मिश्रण असतं. हे पदार्थ शरीराला त्वरित एनर्जी पुरवतात आणि स्नायूंची झीज भरून काढण्यास मदत करतात.

विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?

रोहित शर्मा याने एनर्जी टिकवण्यासाठी पारंपरिक भारतीय जेवणावर आपला विश्वास दाखवला आहे. मॅचदरम्यानच्या ब्रेकमध्ये किंवा जेवणामध्ये त्याने डाळ-भातची निवड केली.

विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?

डाळ-भात हे भारतीय जेवण कार्बोहायड्रेट्सचा एक उत्तम सोर्स आहे, जे शरीराला हळूहळू आणि दीर्घकाळ एनर्जी पुरवतं. डाळ प्रोटीनचा नॅचरल सोर्स आहे, तर भाताने त्वरित ग्लुकोज मिळतं. हे जेवण पचायला सोपं आणि पोट भरणारं असतं.

विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?

आहारतज्ज्ञांच्या मते, रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनीही आपापल्या शरीरयष्टीनुसार आणि सोयीनुसार सर्वोत्तम पदार्थांची निवड केली आहे.

विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?

दोन्ही खेळाडूंची लाईफस्टाईल ही वेगळी आहे. विराट कोहलीसाठी प्रोटीन बार झटपट एनर्जी आणि मसल रिकव्हरीसाठी उपयुक्त आहे, तर रोहित शर्माला डाळ-भातामुळे दीर्घकाळ टिकणारी एनर्जी मिळते.

विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?

दोन्ही प्रकारच्या आहारांचे आपापले फायदे आहेत आणि खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हे डाएट खूप महत्त्वाचं ठरतं असं फिटनेस अँड न्यूट्रिशन एक्सपोर्ट वर्णित यादवने म्हटलं आहे.