पेटीकोटला मराठीत काय म्हणतात? मराठी शब्द आता वापरातूनच बाद होईल की काय? पाहा काय म्हणतात..
Updated:October 29, 2025 17:17 IST2025-10-29T16:42:11+5:302025-10-29T17:17:05+5:30
What is Petticoat called in Marathi : हल्ली फॅशननुसार सॅटीन, सिल्क आणि साडीला उत्तम शेप देण्यासाठी बॉडी शेपर पेटीकोट वापरले जातात.

पेटीकोट (Petticoat) हा बऱ्याच महिलांच्या रोजच्या वापरातील असतो. पण याला मराठीत नेमकं काय म्हणतात ते माहित नसतं.
पेटीकोटला (Petticoat) मराठीत परकर असं म्हणतात. काही ग्रामीण भागात याला घागरा म्हणतात.
पेटीकोट साडीच्या आत परीधान केले जाते. ज्यामुळे साडीला योग्य आधार मिळतो आणि व्यवस्थित नेसता येते.
साडीला फुगीरपणा किंवा सपाट आकार देण्याचे काम परकर करतो. ज्यामुळे साडीचा एकूण लूक आकर्षक दिसतो.
पूर्वी सुती कापडाचे परकर अधिक वापरले जात असतं. जे अतिशय आरामदायक आणि टिकाऊ असतात.
हल्ली फॅशननुसार सॅटीन, सिल्क आणि साडीला उत्तम शेप देण्यासाठी बॉडी शेपर पेटीकोट वापरले जातात.
परकर साडीच्या रंगाशी जुळणारा किंवा आकर्षक कॉन्ट्रास्ट निर्माण करणारा निवडला जातो.