Join us   

"पावरी हो रही है," म्हणत सोशल मिडिया गाजवणारी मुलगी आठवते ? तिनं गुपचूप केलं लग्न ? ब्रायडल लूक व्हायरल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2023 4:40 PM

1 / 9
ये हम हैं...ये हमारी कार है...और ये हमारी पावरी हो रही है... तुम्हाला या ओळी नक्कीच आठवत असतील. आजकाल व्हायरलचा जमाना आहे. सोशल मीडियावर कधी, कोण, कशा प्रकारे व्हायरल, ट्रोल होईल हे सांगता येत नाही. सोशल मिडिया या माध्यमातून व्हायरल झालेल्या या काही ठराविक गाण्यांच्या ओळी आपल्या कायम ओठांवर असतात. पाकिस्तानमधील एका ब्लॉगरने सोशल मीडियावर काही वर्षांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता(Viral 'Pawri Girl' From Pakistan Shares Wedding Pics, But There's A Twist).
2 / 9
या व्हिडिओमध्ये ती त्याच ओळी बोलताना दिसली आणि या व्हिडिओने सोशल मीडियावर असा कहर केला की, या व्हिडीओला व्हूजचा पूर आला आणि 'पावरी हो रही है' हा व्हिडीओ सोशल मीडियावर रातोरात व्हायरल झाला. 'पवारी हो रही है' गर्ल दनानीर मुबीन हिचा नववधूच्या वेशातील झक्कास ब्रायडल लूक देखील सध्या सोशल मीडियावर तितकाच व्हायरल होताना दिसत आहे.
3 / 9
दनानीर ही पाकिस्तानात राहणारी १९ वर्षांची एक यशस्वी ब्लॉगर आहे ती आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना मेकअप आणि फॅशन टिप्स देते. तिच्या इंस्टाग्रामवर तिचे अनेक फोटो आहेत ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे.
4 / 9
दोन - तीन वर्षांपूर्वी ती तिच्या मित्र - मैत्रिणींसोबत पार्टी करत असतानाच तिचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळेच ती रातोरात स्टार बनली होती. केवळ मज्जा, मस्ती म्हणून तिने हा व्हिडीओ बनवला असल्याचे तिने स्पष्ट केले होते.
5 / 9
दनानीरने नुकतेच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन तिचे ब्रायडल लूकमधील फोटो शेअर केले आहेत. गोल्डन लेहेंग्यात दनानीर खूपच छान दिसत होती.
6 / 9
दनानीरने खास पाकिस्तानी पिशवा शैलीतील आयवरी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तिच्या या लेहेंग्यावर गोल्डन रंगाची जरी, बुट्टी व मरुन रंगांचे क्रिस्ट्ल लावून तो अधिक आकर्षक बनवला होता.
7 / 9
ऑर्गेन्झा प्रकारांतील कुर्ती आणि दुपट्ट्यासह मरून रंगाचा लेहेंगा स्कर्ट होता, जो रॉ - सिल्कपासून बनवला होता. या लेहेंग्याच्या सेटची किंमत जवळपास ३,९०,००० रुपये इतकी होती.
8 / 9
तिने या लेहेंग्यावर परफेक्ट मॅच होतील अशा नेकलेस व इयररिंग्सची खास निवड केली होती. गोल्डन चोकर नेकपीस आणि मॅचिंग मांगटिका लावून तिने आपला ब्रायडल लूक पूर्ण केला होता. यासोबतच तिने न्यूड मेकअप करुन आपल्या सौंदर्यात आणखीनच भर घातली होती.
9 / 9
दनानीर मुबीनचा हा ब्रायडल लूक जरी सध्या सोशल मिडीयावर प्रचंड धुमाकूळ घालत असला तरी, खरंच ती लग्न बंधनात अडकली आहे का ? तर नाही, तिच्या एका टीव्ही शोसाठी तिने हा खास ब्रायडल लूक घेतला होता. यासोबतच फोटोत दिसणारी व्यक्ती हा तिचा पती नसून तिचा सहकलाकार आहे.
टॅग्स : सोशल व्हायरल