वटपौर्णिमेला दारासमोर काढा सुरेख रांगोळी; पाहा सहज काढता येतील अशा सोप्या डिझाईन्स...
Updated:June 2, 2023 17:32 IST2023-06-02T17:22:26+5:302023-06-02T17:32:32+5:30
Vatpournima Rangoli Designs

वटपौर्णिमेचा पारंपरिक सण साजरा करत असताना दारासमोर आकर्षक रांगोळी तर हवीच. पाहूयात रांगोळ्यांचे एकसे एक डीझाईन्स (Vatpournima Rangoli Designs)
सकाळी आवरुन पुजेला जायचे असते, एकीकडे स्वयंपाक आणि बाकी तयारी करत असताना झटपट होणारी अशी रांगोळी काढायची असते.
अखंड सौभाग्यासाठी महिला वर्गात ही पूजा मनोभावे केली जाते. अशावेळी सौंभाग्यलंकार असलेली आगळीवेगळी रांगोळी दाराची शोभा वाढवणारी ठरते.
थोडी क्रिएटीव्हिटी असेल आणि वेळ असेल तर असे मंगळसूत्र, नथ असे पारंपरिक दागिने वडाच्या पानात फार सुरेख दिसतात.
वटपौर्णिमेला सवाष्ण महिला एकमेकींना वाण म्हणून आंबा देतात त्यामुळे या आंब्याचा रांगोळीत असा वापर करता येऊ शकतो.
एखाद्या गडद रंगात वडाचं झाड काढलं तर तेही रांगोळी म्हणून अतिशय सुंदर दिसू शकतं.
घराबाहेर थोडी मोठी जागा असेल आणि थोडी कल्पकता वापरायला वेळ असेल तर अशाप्रकारची डिझाईन रांगोळीत लक्ष वेधून घेणारी ठरु शकते.
झटपट होणारी अतिशय साधी तरीही छान दिसणारी ही रांगोळी तुम्ही यंदाच्या वर्षी नक्की ट्राय करु शकता.