Tulsi Vivah Rangoli : तुळशीच्या लग्नासाठी ५ मिनिटांत काढा तुळशी वृंदावनाची खास रांगोळी; ८ सोप्या रांगोळ्या, उठून दिसेल दार
Updated:November 12, 2024 13:55 IST2024-11-12T13:13:25+5:302024-11-12T13:55:04+5:30
Tulsi Vivah Rangoli : अगदी ५ ते १० मिनिटांत सुंदर, आकर्षक अशी तुळशी वृंदावनाची रांगोळी काढून होईल.

तुळशीच्या लग्नाचा सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दिवाळीच्या ४ दिवसांप्रमाणेच तुळशीच्या लग्नाच्या दिवशी संपूर्ण घरात रोशणाई केली जाते दिवे लावले जातात आणि रांगोळ्याही काढल्या जातात. (Tulsi Vivah Rangoli)
तुळशीच्या लग्नाच्या दिवशी साधी रांगोळी न काढता तुम्ही तुळशी वृंदावनाची रांगोळी काढू शकता. ही रांगोळी काढणं अत्यंत सोपं आहे. (Tulsi Vrindavan Rangoli Designs)
अगदी ५ ते १० मिनिटांत सुंदर, आकर्षक अशी तुळशी वृंदावनाची रांगोळी काढून होईल.
तुळशीच्या रांगोळीत तुम्ही मोरपंख आणि कमळाची डिजाईन काढू शकता.
तुळशी वृंदावन काढल्यानंतर तुम्ही त्यात स्वास्तिक आणि दिव्यांची डिजाईन काढू शकता.
जर तुम्हाला फार मोठी रांगोळी काढण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही लहान सर्कलमध्ये छोटी तुळस काढू शकता.
तुळशीच्या आजूबाजूला तुम्ही बासरी आणि मोरपिसाची रांगोळी काढू शकता.
(Image Credit-Social Media, You Tube)