गणपती बाप्पाच्या स्वागताला काढा मस्त नक्षीदार पाऊलं, पाहा रांगोळीच्या पाऊलांच्या सुंदर सोप्या आयडिया
Updated:August 25, 2025 17:31 IST2025-08-25T17:24:11+5:302025-08-25T17:31:03+5:30
Rangoli ideas for Ganpati Celebration , easy but beautiful rangoli anyone can try : गणपती बाप्पाच्या आगमनासाठी काढा अशी पाऊले. सोप्या पद्धतीच्या रांगोळी.

गणपती अगदी दोन दिवसावर आहेत. बाप्पाच्या स्वागताच्या तयारीत काहीच कमी राहता कामा नये अशी सगळ्यांचीच इच्छा असते. त्यामुळे पूर्व तयारी फार महत्त्वाची. बाप्पा घरी विराजमान होण्यासाठी जेव्हा येतात तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी दारात छान पाऊल काढायची पद्धत आहे.
रंगीत पावलांची रांगोळी काढली जाते. ही पाऊले बाप्पाला घरी येण्यासाठी दिलेले आमंत्रण असतात. आनंदाने आमच्या घरी या आणि नांदा यासाठी ही पाऊले काढली जातात. छान सोप्या पद्धतीने पाऊलांची रांगोळी काढता येते. त्यासाठी खास डिझाइन पाहा.
जर फार छान रांगोळी काढता येत नाही. तर मग ही रांगोळी नक्की काढून पाहा. एकदम सोपी आहे.
दोन रंगांचा वापर करुन ही रांगोळी काढून पाहा, अगदी सुंदर दिसेल. पाच मिनिटांचे काम.
पाऊले काढून त्यात एखादा रंग भरायचा. असेही छान दिसते आणि घराच्या सगळ्या दारांसमोर काढता येते.
पाऊलांचे छापेही मिळतात. त्यातून आवडत्या रंगाची पाऊले काढणे अगदीच सोपे आहे. फक्त जाळी उचलताना हलक्या हाताने उचलावी.
विविध प्रकारे पाऊलांचे आकार काढता येतात. पिवळा पांढरा लाल रंग वापरता येतो. अगदी मस्त दिसेल आणि काढायला एकदम सोपी आहे.