Join us   

गणपती बाप्पासमोर काढा सोपी आकर्षक रांगोळी, घ्या एक से एक डीझाईन्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2023 4:47 PM

1 / 10
गणपती बाप्पा वर्षभराने आपल्या घरी येणार म्हणजे त्यांच्या स्वागतासाठी लायटींग, डेकोरेशन, रांगोळी हे सगळे तर हवेच (Rangoli Designs Ganpati Festival Special).
2 / 10
बाप्पासमोर बाप्पाचीच रांगोळी काढायची तर त्यासाठी डोक्यात डीझाइन्स असायला हव्यात. गडबडीत तुम्हाला रांगोळी डीझाइन्स सुचत नसतील तर त्यासाठीच आज आम्ही खास लिस्ट घेऊन आलो आहोत.
3 / 10
गणपतीची साधीशी पण तितकीच आकर्षक रांगोळी काढायची असेल तर असा फुलांच्या मखरात बसलेला गणपती तुम्ही नक्की काढू शकता.
4 / 10
बाजूने नक्षीदार बॉर्डर आणि मध्यभागी गणपतीची सोंड आणि कान असे प्रतिकात्मक काढले तरीही ते दारासमोर किंवा बाप्पासमोर फार सुरेख दिसते.
5 / 10
तुमच्याकडे फारशी कल्पकता नसेल पण तरीही तुम्हाला बाप्पा काढायचा असेल तर हा अतिशय साधा पण कलरफुल बाप्पा तुम्ही रेखाटू शकता.
6 / 10
मोरपीसांप्रमाणे दिसणारी रंगीत बॉर्डर आणि त्यात मध्यभागी विरुद्ध रंगांचे कॉम्बिनेशन करुन काढलेला साधासा गणपती बाप्पा फार छान दिसतो.
7 / 10
रांगोळी काढण्यासाठी आवश्यक असणारे पेशन्स तुमच्याकडे नसतील तर एकाच रंगात कोरुन छानशा गणपती काढता येतो. तो दिसायलाही आकर्षक दिसतो.
8 / 10
जास्वंदाची फुलं आणि पानं यांच्या रुपातील गणपती बाप्पा काढायला थोडा किचकट वाटू शकतो. पण ही रांगोळी पूर्ण झाल्यावर अतिशय सुंदर दिसते.
9 / 10
गजाननाचे मुख आणि डोकं म्हणून शंख अशी अप्रतिम संकल्पना असलेला हा गणपती काढायला त्या मानाने सोपा आहे. थोडी मोठी जागा असेल आणि हातात कला असेल तर ही रांगोळी नक्की छान जमू शकते.
10 / 10
कमळाच्या पाकळ्यांमधली रंगबिरंगी गणपतीचे मुख फारच सुबक दिसते. नक्षीकाम असल्याने यासाठी थोडा वेळ लागू शकतो.
टॅग्स : सोशल व्हायरलरांगोळीगणपतीगणेशोत्सव