पावसामुळे लाकडी दरवाजे फुगले, कपाटांना वाळवी लागली? ५ सोपे उपाय, वाळवी होईल गायब

Updated:July 25, 2025 17:18 IST2025-07-25T17:15:36+5:302025-07-25T17:18:31+5:30

Termite treatment at home: Swollen door remedy rainy season: Monsoon furniture protection : आपल्या घरातही वाळवी लागली असेल तर सोपे उपाय करुन पाहा.

पावसामुळे लाकडी दरवाजे फुगले, कपाटांना वाळवी लागली? ५ सोपे उपाय, वाळवी होईल गायब

स्वयंपाकघरातील लाकडी कपाट, दरवाजे किंवा भिंती घराच्या सौंदर्यात भर घालतात. पण दैनंदिन वापरामुळे त्यावर ग्रीस, धूळ आणि डागांचे थर जमा होतात. त्यावर साचलेली घाण केवळ घर खराब करत नाही तर हळूहळू लाकडाचे नुकसान करते. (Termite treatment at home)

पावसामुळे लाकडी दरवाजे फुगले, कपाटांना वाळवी लागली? ५ सोपे उपाय, वाळवी होईल गायब

पावसाळ्यात वातावरण दमट असते त्यामुळे धूळ, वाळवी लागण्याची शक्यता असते. वाळवी लागल्याने लाकडी कपाट, दरवाजे, खुर्च्या, टेबल अशा सगळ्या वस्तूंना पोखरुन काढते. जर आपल्या घरातही वाळवी लागली असेल तर सोपे उपाय करुन पाहा. (Swollen door remedy rainy season)

पावसामुळे लाकडी दरवाजे फुगले, कपाटांना वाळवी लागली? ५ सोपे उपाय, वाळवी होईल गायब

कपाट, दरवाज्यांना वाळवी, धूळ लागली असेल किंवा तेलाचे-ग्रीसचे डाग काढून टाकायचे असेल तर २ ते ३ चमचे बेकिंग सोडा घालून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट डागांवर लावा, नंतर स्पंजने पुसा.

पावसामुळे लाकडी दरवाजे फुगले, कपाटांना वाळवी लागली? ५ सोपे उपाय, वाळवी होईल गायब

व्हिनेगर हे उत्तम नैसर्गिक क्लिनर आहे. ते वापरण्यासाठी स्प्रे बाटलीत व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात मिसळा. वाळवी किंवा डागांच्या ठिकाणी स्प्रे करा. स्पंज किंवा कापडाने पुसा.

पावसामुळे लाकडी दरवाजे फुगले, कपाटांना वाळवी लागली? ५ सोपे उपाय, वाळवी होईल गायब

लिंबाचा रस लाकडी वस्तूंना नव्याने चमक देते. लिंबाच्या रसात २ चमचे ऑलिव्ह ऑइल मिसळा. कपाट हलक्या कापडाने पुसा. ज्यामुळे डाग किंवा तेल निघून जाण्यास मदत होईल.

पावसामुळे लाकडी दरवाजे फुगले, कपाटांना वाळवी लागली? ५ सोपे उपाय, वाळवी होईल गायब

लाकडी कपाट नेहमी कोरड्या कापडाने पुसून टाका, लगेच वाळवा. लाकडावर जास्त वेळ पाणी राहू देऊ नका. अन्यथा ते खराब होतील.