झटपट स्वयंपाक करण्याच्या ५ ट्रिक्स, सकाळची घाई असो की रात्री दमल्यानंतरचा स्वयंपाक-पदार्थ करा पटपट
Updated:January 27, 2026 20:00 IST2026-01-27T20:00:00+5:302026-01-27T20:00:02+5:30
quick cooking tips: easy cooking hacks: fast meal preparation: काही स्मार्ट ट्रिक्स वापरल्या तर पदार्थ झटपटही होतो आणि आरामही मिळतो.

धावपळीच्या या युगात वेळेच नियोजन करणं सर्वात मोठं आव्हान असतं, विशेषत: गृहिणींसाठी. सकाळचा डबा असो किंवा रात्रीचे जेवण, स्वयंपाकघरात तासनतास उभं राहून काम केल्याने फक्त थकवा येत नाही तर आपल्या इतर कामांकडे देखील दुर्लक्ष होते. (quick cooking tips)
स्वयंपाक करताना काही स्मार्ट ट्रिक्स वापरल्या तर पदार्थ झटपटही होतो आणि आरामही मिळतो. (easy cooking hacks)
भात शिजवताना तो चिकट झाला तर त्यात लिंबाचा तुकडा घाला. ज्यामुळे तो मऊ आणि मोकळा होतो.
जळलेली कढई स्वच्छ करण्यासाठी त्यात व्हिनेगर आणि मीठ घाला. १० मिनिटानंतर घासा, कढई चमकण्यास मदत होईल.
आले-लसूणची पेस्ट करण्यासाठी त्यात मोहरीचे तेल घाला, रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. रंग आणि चव दोन्ही आठड्याभरापर्यंत टिकतील.
सकाळच्या वेळी कडधान्ये शिजवणं वेळखाऊचं काम असतं. अशावेळी आठवड्याभराचे कडधान्य उकडून त्याचे भाग करा आणि फ्रीजरमध्ये साठवा.
आपण कांदा-टोमॅटोचे वाटण आधीच फ्रीजमध्ये ठेवले तर कोणतीही रस्सा भाजी अवघ्या १० मिनिटांत होऊ शकते.
भाज्या शिजवण्यासाठी कुकरचा वापर केल्यास गॅसची आणि वेळेची बचत होते. डाळ आणि तांदूळ एकाच वेळी कुकरच्या वेगवेगळ्या डब्यात लावले तर वेळ अर्ध्यावर येतो.