२० वर्षांच्या संसारानंतर मेरी कॉमचा घटस्फोट, खडतर आयुष्य, कठोर परिश्रम - मेरी कॉमच्या जीवनाची गोष्ट!
Updated:May 3, 2025 14:03 IST2025-05-03T13:34:58+5:302025-05-03T14:03:54+5:30
Mary Kom Confirms Divorce From Husband Onler, Breaks Silence On Rumours Of Dating 'Another Boxer's Husband' : Mary Kom Opens Up About Divorce and 'Affair': Confirmed! Mary Kom says divorced under Kom customary law; refutes buzz of any other relationship : भारताची स्टार बॉक्स मेरी कॉम आणि पती ऑनलर यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मिडियात होत आहेत...

भारताची बॉक्सिंग आयकॉन आणि ऑलम्पिक पदक विजेती मेरी कॉम (Mary Kom) सध्या तिच्या घटस्फोटामुळे फारच चर्चेत आहे. आठ वेळा विश्वविजेती आणि पद्मभूषण पुरस्कार विजेती मेरी कॉमने स्वतः सोबतच आपल्या देशाचे (Mary Kom Confirms Divorce From Husband Onler, Breaks Silence On Rumours Of Dating 'Another Boxer's Husband) नाव देखील उंचावले आहे.
अतिशय खडतर परिस्थितीतून तिने बॉक्सिंगमध्ये नाव कमावल. बॉक्सिंग खेळासाठी तिने तीच संपूर्ण आयुष्य पणाला लावलं.
मेरी कॉमचा जन्म एका गरीब आदिवासी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच तिला खेळांची आवड होती. पण बॉक्सिंगसारख्या पुरुषप्रधान क्षेत्रात मेरी कॉमला गुप्तपणे प्रशिक्षण घ्यावे लागले, तिचं कुटुंब आणि समाजाकडून पाठिंबा नसल्याने तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. असे असले तरीही हार न मानता सातत्याने प्रयत्न करणे तिने कधीच सोडले नाही.
मेरी कॉमने आपल्या २५ वर्षांच्या करियरमध्ये खूप चढ - उतार पाहिले. सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप किताब मिळवणारी ही जगातील एकमेव बॉक्सर महिला आहे.
मेरी कॉम हिचा विवाह ऑनलर कोम यांच्याशी झाला. ऑनलर कॉम हे नागालॅंडचे असून दिल्लीतील नेहरू कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना मेरीशी त्यांची भेट झाली. त्यानंतर दोघांनी २००५ मध्ये विवाह केला. ऑनलर कॉम हे नेहमीच मेरीला सगळ्या गोष्टीत पाठिंबा देत आले आहेत आणि तिच्या यशामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.
लग्नानंतर मेरीने काही काळ खेळाला विराम दिला आणि ती मनापासून संसार करण्यात रमली. मात्र आपल्या वैयक्तिक स्वप्रांचे भान देखील तिने कायम ठेवले. २००७ मध्ये जुळ्या मुलांना आणि २०१३ मध्ये मेरीने तिसऱ्या मुलाला जन्म दिला. मेरी कॉमने २०१८ मध्ये एका मुलीला दत्तक घेतले तिचे नाव मेरिया कॉम आहे. तिने आई होऊनही बॉक्सिंग करिअर पुढे सुरू ठेवले आणि यशाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत गेली.
मेरी कॉम आणि पती ऑनलर या दोघांनी आता २० वर्षाचा संसार संपवण्याचा निर्णय घेतल्याच म्हटल जातय. या जोडप्याने ३० डिसेंबर २०२३ रोजी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला आहे. घटस्फोटानंतर सुमारे १६ महिन्यांनी त्यांनी ही घोषणा केली आहे. मेरी कॉमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, अनेकांनी अफवा पसरवण्यास जेव्हा सुरुवात केली तेव्हा तिने त्यांच्या नात्याबद्दल सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत माहिती दिली.
ओनलर यांचा २०२२ मध्ये मणिपूर विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. निवडणुकीच्या काळात कोट्यवधी रुपयांच नुकसान झाल्यामुळे ओनलर आणि मेरी कॉम यांच्यात वाद होण्यास सुरुवात झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.