मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल : देवीसमोर काढा सुंदर रांगोळी, पाहा ६ सुंदर- सोप्या-सुबक डिझाइन्स
Updated:November 29, 2022 18:24 IST2022-11-29T17:26:40+5:302022-11-29T18:24:07+5:30
Margashirsha Gurwar Rangoli Designs : दर गुरुवारी काय रांगोळी काढायची हे सुचत नसेल तर आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास डिझाईन्स घेऊन आलो आहोत.

मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार महिलांसाठी विशेष असतो. या दिवशी देवीची पूजा, उपवास असे व्रत आवर्जून केले जाते. अशावेळी देवीसमोर सुबक छान अशी रांगोळीही काढली जाते. पण दर गुरुवारी काय रांगोळी काढायची हे सुचत नसेल तर आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास डिझाईन्स घेऊन आलो आहोत (Margashirsh Gurwar Rangoli Designs).
देवीसमोर रांगोळी काढताना कमी वेळात छान रांगोळी काढायची असेल तर देवीची पाऊलं काढणं हा सर्वात सोपा उपाय असतो.
तुम्हाला छान रंगबिरंगी डिझाईन्स आवडत असतील तर अशाप्रकारे छान गडद रंगांचा वापर करुन त्यामध्ये छापाची किंवा हाताने पाऊले काढल्यास ते फार छान दिसते.
तुमच्याकडे थोडा वेळ असेल आणि देवीच्या पुजेसमोर बऱ्यापैकी जागा असेल तर कमळ आणि त्यावर कलश असे देवीचे रुप तुम्ही रांगोळीच्या माध्यमातून दाखवू शकता.
मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार म्हणजे देवीचा वार समजला जातो. तुमच्याक़डे थोडी कल्पकता आणि आवड असेल तर देवीचा मुखवटा काढणे हा एक छान आणि वेगळा पर्याय ठरु शकतो. ही रांगोळी आपण देवीपुढे किंवा दारात कुठेही काढू शकतो.
ऑफीसला जाण्याच्या घाईत झटपट काहीतरी करायचे असेल आणि आपल्याकडे फारसे रंग उपलब्ध नसतील तर अशाप्रकारची साझी-सोपी रांगोळी काढणे हा उत्तम पर्याय ठरु शकतो.
झटपट सुबक रांगोळी काढायची असेल तर कमीत कमी कष्टात असा देवीचा छानसा मुखवटा काढता येऊ शकतो. झटपट होणारी आणि रंगीबेरंगी अशी ही रांगोळी देवीसमोर उठून दिसते.