मकर संक्रांत स्पेशल : हळदीकुंकवासाठी दारासमोर काढा झटपट-आकर्षक रांगोळी, पाहा सोपे डिझाईन्स...
Updated:January 14, 2024 16:12 IST2024-01-14T16:05:26+5:302024-01-14T16:12:07+5:30
Makar Sankranti Special Easy Rangoli Designs

सणावाराला दारात रांगोळी काढणे शुभ मानले जात असल्याने आपल्याकडे सणानुसार आवर्जून रांगोळी काढण्याची पद्धत आहे (Makar Sankranti Special Easy Rangoli Designs).
मकर संक्रांत हाही संक्रमणाच्या दृष्टीने हिवाळ्यात येणारा १ महत्त्वाचा सण असून या दिवशी महिला एकमेकींकडे हळदी-कुंकवाला जातात.
दारात झटपट आणि तरीही सोपी अशी रांगोळी काढायची असेल तर ऐनवेळी काय काढायचे हे आपल्याला सुचत नाही.
पतंग आणि हळदीकुंकू हे संक्रांतीच्या सणाची प्रतिकं असल्याने ती रांगोळीत काढण्याची पद्धत आहे.
गडद रंगांचा वापर करुन साधासा पतंग आणि मांजाचा रीळ काढल्यासही झटपट अशी सोपी रांगोळी काढता येऊ शकते.
तीळगूळ , हळद कुंकू, पतंग असे सगळे एकाच रांगोळीत कलात्मक पद्धतीने दाखवायचे असेल तर हा चांगला पर्याय ठरु शकतो.
संक्रांतीला महिला एकमेकींना वसा देतात ते लहान आकाराचे गडू ठेवून अशी थोडी वेगळी रांगोळी काढली तरी ती आकर्षक दिसते.
गडद रंगात आकर्षक असे सौभाग्यलंकार काढलेली ही रांगोळी हळदीकुंकवाला काढण्यासाठी अगदी सोपी आहे.