Join us   

मकर संक्रांत स्पेशल: हळदीकुंकवाला वाण देण्यासाठी १० रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणाऱ्या पाहा सुंदर वस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2024 9:40 AM

1 / 9
मकर संक्रांत हा सण जवळ आला की आपल्याला सगळ्यात आधी आठवतात ते तिळाचे लाडू, वड्या आणि गुळाच्या पोळ्या. या सगळ्यात आणखी एक गडबड असते ती म्हणजे संक्रांतीला हळदीकुंकवाला बोलावलेल्या महिलांना वाण काय द्यायचं (Makar Sankranti haldikunku Van Options in 10 Rupees) ?
2 / 9
दरवर्षी वेगळी आणि महिलांना आवडेल अशी वस्तू काय लुटायची हा एक मोठा प्रश्न असतो. यातही खूप बायका येणार असतील तर ही वस्तू बजेटमध्ये असायला हवी असा विचारही असतोच.
3 / 9
या संक्रांतीला काय वाण द्यायचे असा प्रश्न पडला असेल तर आज आपण १० रुपयांत मिळतील असे काही सोपे पर्याय पाहणार आहोत.
4 / 9
कंगवा हा महिलांना कायम लागणारी गोष्ट असून वाण म्हणून १० रुपयांमध्ये येणारे कंगवे नक्कीच देता येतात.
5 / 9
नॅपकीन किंवा रुमाल ही प्रत्येकालाच लागणारी आणखी एक महत्त्वाची गोष्ट असून होलसेल मार्केटमधून डझनानी नॅपकीन घेतले तर तो उपयुक्त होऊ शकतो.
6 / 9
केसांना लावतो ती हेअर क्लिप हाही एक चांगला पर्याय असू शकतो. कारण ती रोजच्या वापरातली अतिशय गरजेची वस्तू असते.
7 / 9
साबणही अगदी ५ ते १० रुपयांत येतो आणि ती रोजच्या वापरातली गरजेची वस्तू आहे.
8 / 9
बिस्कीटचा पुडा हाही महिलांना बॅगमध्ये अडीनडीला लागतो, त्यामुळे तोही देतो येऊ शकतो.
9 / 9
मसाल्याचे पाकीट ही स्वयंपाकघरात महिलांना नियमित लागणारी गोष्ट असून पावभाजी किंवा किचन किंग मसाला हाही वाण म्हणून चांगला पर्याय होऊ शकतो.
टॅग्स : सोशल व्हायरलमकर संक्रांती